‘या’ अवतारामुळे करिना ट्रोलर्सच्या जाळ्यात; युजर्स म्हणाले, ‘बॉडी बिल्डर’

‘या’ अवतारामुळे करिना ट्रोलर्सच्या जाळ्यात; युजर्स म्हणाले, ‘बॉडी बिल्डर’

'या' अवतारामुळे करिना ट्रोलर्सच्या जाळ्यात; युजर्स म्हणाले, 'बॉडी बिल्डर'

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आपल्या प्रत्येक आउट फिटमधून युनिक स्टाईल फ्लॉन्ट करत असते. मग तो जिम वेअर असतो किंवा पार्टी वेअर असो, कॅज्युअल असो किंवा एअरपोर्ट लूक असो. करिना कोणाचीही पर्वा न करता आपली स्टाईल करत असते. पण असे केल्याने अनेक वेळा करीना वियर्ड फॅशनमुळे ट्रोल होते. सध्या असे काहीसे करीनासोबत पुन्हा घडले आहे. नुकतेच सैफ अली खानसोबत करीनाला स्पॉट केले होते. यावेळेस करीना रेड शिमरी टँक टॉप आणि बॅगी जिन्समध्ये दिसली होती. यासोबत तिने ब्लॅक हिल्स, सनग्लासेज आणि बन शेप हेअरस्टाईल केली होती. करीनाचा हा कॅज्युअल लूक इतर दिवसांपेक्षा वेगळा होता. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचा हा फॅशन सेंस बिल्कुल आवडला नाही. सोशल मीडियावर सध्या या लूकमुळे करीना चर्चेत आली असून तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे.

एका युजरने लिहिले आहे की, ‘हे ईश्वरा Bottega बॅग पण तिच्या पूर्ण स्टाईलला वाचवू शकत नाही.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘करीना आपला फॅशन गेम खूप खालवत आहे.’ तसेच तिसऱ्या युजरने लिहिले की, ‘तुझ्या स्टाइलिस्टला बाहेर काढ.’ करीनाच्या या स्टाईलवर युजरने भरभरून प्रतिक्रिया दिला आहे.

एकाने लिहिले आहे की, ‘असे वाटतेय करीना स्विमसूट बदलायला विसरली आहे.’ तर दुसऱ्याने हद्दच पार केली आहे. त्याने लिहिले आहे की, ‘करीना बॉडी बिल्डर दिसत आहे.’ सोशल मीडिया युजर्सने करीनाच्या या आऊफफिटला क्रिटिसाईज केले आहे.


हेही वाचा – ‘गंगूबाई काठियावाडी’ ते ‘नीरजा’पर्यंत; महिलांवरील आधारित ‘या’ चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक गल्ला कमावला


First Published on: March 6, 2022 3:40 PM
Exit mobile version