फक्त जीम करुन बाॅडी बनवतात, अभिनयाच्या नावाने मात्र शंख; रत्ना पाठकांनी नव्या कलाकारांना सुनावले

फक्त जीम करुन बाॅडी बनवतात, अभिनयाच्या नावाने मात्र शंख; रत्ना पाठकांनी नव्या कलाकारांना सुनावले

रत्ना पाठक शहा यांचे नव्या अभिनेत्यांबाबत परखड मतं

ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शहा या नेहमीच त्यांच्या स्पष्टोक्तीपणासाठी ओळखल्या जातात. अनेक विषयांवर त्या आपले मत स्पष्टपणे आणि निर्भीडपणे मांडत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी नव्या अभिनेत्यांबाबत असेच परखड मत मांडले आहे.

रत्ना पाठक यांनी मागच्या 40 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. त्यांनी नवीन-जुन्या अशा अनेक पिढ्यांतील कलाकारांसोबत काम केले आहे. हे काम करत असताना त्यांनी जे नवीन कलाकारांचे निरिक्षण केले आहे. त्यावरुन त्यांनी नव्या कलाकारांना खडे बोल सुनावले आहेत. त्या म्हणाल्या की, काही कलाकार हे स्वत:चा काॅफीचा कपदेखील स्वत: पकडत नाहीत. त्याचा रोष हा त्या कलाकारांकडे होता जे फक्त जीम करुन बाॅडी बनवतात आणि सलग फ्लाॅप सिनेमे देतात.

रत्ना पाठक शहा या हॅप्पी फॅमिली कंडिशन्स अप्लाय ही त्यांची नवी बेवसिरीज येत आहे. या वेबसिरीजमध्ये त्यांनी हेमलता बेन ही एका गुजराती कुटुंबातील हाऊस वाईफची व्यक्तिरेखा साकारली आहे. रत्ना पाठक या साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेने घराघरांत पोहोचल्या. त्यांच्या हॅप्पी फॅमिली या वेबसिरीजच्या प्रमोशसाठी आल्या असताना त्या सेटवर उपस्थित असलेल्या अभिनेत्यांच्या विचित्र हालाचालींवर त्यांनी ही टीका केली आहे.

( हेही वाचा:सलमानने गायलं ‘किसी का भाई किसी की जान’ मधील ‘जी रहे थे हम’ गाणं)

नेमकं काय म्हणाल्या रत्ना पाठक?

रत्ना पाठक म्हणाल्या की, असे कितीतरी कलाकार पाहिले आहेत, जे सेटवर पणसोबत वर्कआऊट करण्यासाठी टीम आणतात. जे यांचे इक्विपमेंट्स सांभाळतात. मग हे काय करतात? पण हे सगळे अभिनयाच्या नावाने मात्र शंख आहेत. त्यामुळे हे किती योग्य आहे? जीम इक्विपमेंट, स्वत:च कॅटरर्स आणि शेफ हे सगळे सोबत ठेवून त्यांच्या सिनेमाने कमाई किती केली? सिनेमाने तेवढा पैसा कमावला का जितका लावलेला? हे आधी पहा, हे सगळं जे सुरु आहे, तो मुर्खपणाच आहे.

रत्ना पाठक पुढे म्हणाल्या की, मी एका अशा अभिनेत्याला पाहिले आहे जो स्वत:ची एक कप काॅफीदेखील स्वत: घेऊ शकत नाही. त्यासाठी पण एक हेल्पर असतो. अगदी फ्लाईटमध्ये सुद्धा. तोच काॅफीचा कप आणतो, तोच कपचे झाकण काढून मग तो कप यांच्या हातात देतो. मग हे एक एक घोट काॅफी पिणार आणि मग तो या हेल्परकडे देणार. तुम्ही काय लहान आहात का, हे सर्व करायला? हे काय 3 महिन्याच्या मुलासारखं सगळं सुरु आहे. सगळ्याच बाबतीत तुम्ही दुस-यांवर अवलंबून आहात. आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. तेव्हा काय करणार? हे सगळं खूप भीतीदायक असल्याचे मतं रत्ना पाठक यांनी यावेळी मांडले.

First Published on: March 20, 2023 6:57 PM
Exit mobile version