वीणा मलिकने विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दल केलं वादग्रस्त टि्वट

वीणा मलिकने विंग कमांडर अभिनंदन यांच्याबद्दल केलं वादग्रस्त टि्वट

भारताविरोधात वादग्रस्त विधान करणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूड चित्रपटात काम करणारी या पाकिस्तानी अभिनेत्रीने भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याबद्दल वादग्रस्त टि्वट केलं आहे. या टि्वटनंतर ती भारतीय नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. भारतीय नेटकऱ्यांनी तिला चांगलच झापले आहे. टि्वटमध्ये वीणाने अभिनंदन यांचे दोन छायचित्र शेअर केले आहेत. यातील एका छायाचित्रात विंग कमांडर अभिनंदन विमानाच्या बाजूला उभे आहेत. तर दुसऱ्या छायाचित्रात विंग कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असून जखमी झालेले दिसत आहे.

तिने हे टि्वट करताना पाकिस्तानी हवाईदलाचे गुणगाण गायले आहेत. वीणा मलिकने असं लिहिले आहे की, ‘सारं काही फोटो सांगतोय. पूर्वी आणि नंतर. पाकिस्तानी वायुसेना अशीच परिस्थिती करून ठेवते.’ हे कॅप्शन तिने छायचित्रासह शेअर केलं आहे. नेटकऱ्यांनी वीणा मलिकला अचानक आठवण झाल्याचे म्हटले आहे. तिला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे.

फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्लानंतर भारताने पाकिस्तानच्या बालकोट येथे एअर स्ट्राइक केले. या एअर स्ट्राइकला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने लढाऊ विमान भारतीय हद्दीत पाठवली. या पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावण्यासाठी भारताने २७ फेब्रुवारीला सकाळी आकाशात संघर्ष करण्यात आला. या संघर्षात मिग २१ घेऊन उड्डाण करणारे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ हे विमान पाडले. पण यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन यांच्या विमानाचा अपघात झाला. त्यांचे मिग २१ हे विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. अभिनंदन हे पॅराशटूच्या साहाय्याने उतरताना पाकिस्तानमध्ये उतरले. यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याने तुरूंगात टाकले. पण नंतर व्हिएन्ना कराराअंतर्गत पाकिस्तानला विंग कमांडर अभिनंदन यांना भारताकडे सोपवावे लागले. १५ ऑगस्टला अभिनंदन यांना पाकिस्तानी विमानांसमोर धैर्याने उभे राहिल्याबद्दल वीरचक्र पदक प्रदान करण्यात आले. त्यांची वैद्यकीय चाचणीही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. लवकरच ते पुन्हा विमान उडवताना दिसतील.


हेही वाचा – व्हायरल होतोय बाथटबमध्ये बसलेल्या परिणीतीचा ‘हा’ फोटो!


 

First Published on: August 21, 2019 6:33 PM
Exit mobile version