Oscar 2021 च्या शर्यतीत विद्या बालनचा ‘नटखट’ लघुपट

Oscar 2021 च्या शर्यतीत विद्या बालनचा ‘नटखट’ लघुपट

काही चित्रपट असे असतात की ते मोठ्या प्रमाणात प्रदर्शित केले जातात आणि ते प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरतात. तर काही चित्रपट असे असतात ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊन देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवतात. अभिनेत्री विद्या बालनचा असाच एक लघुपट गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता या लघुपटाने ऑस्करमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. कोरोनादरम्यान संपूर्ण देश कोरोना महामारीशी झगडत असताना चित्रपटगृह बंद होते. त्यावेळी नटखट हा लघुपट युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र हाच लघुपट फिल्म ऑस्कर २०२१ मधील Best Short Film category मधील शर्यतीत दाखल झाला आहे.

हाच आनंद सेलिब्रेट करताना अभिनेत्री विद्या बालन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नटखट या लघुपटाचे पोस्टर आणि व्हिडिओ देखील चाहत्यांसह शेअर केला आहे. हा लघुपट अवघ्या  ३० मिनिटांचा असून त्यातील विषयाच्या मांडणीसह केलेली विषय़ाची हाताळणी सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टीव्हलमध्ये ‘नटखट’ गौरविण्यात आला होता. त्यानंतर २०२१ सालच्या ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले होता.

ऑस्करच्या शर्यतीत सहभागी होताना या लघुपटात लिंग-समानतेच्या नाजूक विषयाची हाताळणी केल्याचे दिसून येते. असा विषय एखाद्या लघुपटात अत्यंत सावधगिरीने मांडला आहे. या लघुपटाचे दिग्दर्शक शान व्यास आहेत आणि त्याची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. हा लघुपट २ जून २०२० रोजी प्रदर्शित करण्यात आला होता. या लघुपटाचा प्रिमियर ट्रिबेकाच्या वी आर वन: ए ग्लोबल फिल्म फेस्टिवल आणि गेल्या वर्षीच इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नसह लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आला होता.

First Published on: February 5, 2021 2:07 PM
Exit mobile version