आलियाचे अंडरवॉटर फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ!

आलियाचे अंडरवॉटर फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ!

बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट हिने नुकतेच अंडरवॉटर फोटोशूट केले. एका मासिकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आलियाचा अंडरवॉटर हॉट अंदाज पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

एका मासिकासाठी आलियाने अंडरवॉटर फोटोशूट केले. यामध्ये तिने ब्लू, पर्पल, पिंक, मैटेलिक, नियॉन या रंगाची मोनोकनी घातली आहे. वॉग या मासिकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. आलियाने तीन फोटो शेअर केले आहेत. पैकी एका फोटोत पाण्यात उडी घेताना तर दोन फोटोंमध्ये तिने एक्सप्रेशन दिले आहेत.

या तिनही फोटोंना लाखो नेटकऱ्यांनी लाइक केले आहे. तर तिच्या चाहत्यांनी या फोटोवर तिला कमेंट सुद्धा केले आहे. त्यानुसार तिचे अंडरवॉटर फोटोशूट पाहून अनेकांनी तिला वॉटर बेबी म्हणून स्तुती केली आहे.

First Published on: November 6, 2019 11:50 AM
Exit mobile version