मोदींच्या जवळच्या अक्षय कुमारची शपथविधीला गैरहजेरी का?

मोदींच्या जवळच्या अक्षय कुमारची शपथविधीला गैरहजेरी का?

’मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं…’ असे म्हणत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात उपस्थित असलेले सहा हजारांपेक्षा जास्त आमंत्रित आणि टीव्हीवरून हा सोहळा बघणारे जगभरातील कोट्यवधींच्या साक्षीने नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख, महासत्तांचे राजदूत, देशातील प्रमुख नेतेमंडळी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रिटी यांच्यासह सुमारे ६ हजार पाहुणे या सोहळ्याला उपस्थित होते. या सगळ्यांमध्ये अमेक सेलेब्रेटीही या सोहळ्याला उपस्थित होते. मात्र अभिनेता अक्षय कुमार या सोहळ्याला गैरहजर होता. मोदींच्या इतका जवळचा अक्षय महत्त्वाच्या क्षणी का उपस्थित नव्हता अशी चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

अक्षय कुमारची अनुपस्थिती खटकली

मोदी सरकारच्या शपथ विधी सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली. यात कंगना रणावत, दिग्दर्शक करण जोहर, विवेक ओबेरॉय, शाहीद कपूर, मधूर भांडारकर यांची उपस्थिती होती मात्र अभिनेता अक्षय कुमार सोहळ्याला गैरहजर राहिल्यामुळे नेटकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. निवडणूकी आधी अक्षय कुमार पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत विशेष गाजली होती. या मुलाखतीची अनेकांनी प्रशंसाही केली. तर काहींनी टीका ही केली. मात्र या मुलाखती दरम्यान अक्षय आणि मोदी यांची मैत्री दिसून आली. मात्र असे असतानाही अक्षय शपथविधीला का आला नाही असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

या कलाकारांची शपथविधीला उपस्थिती

शपथविधी

 

अभिनेता रजनीकांतचीही विशेष उपस्थिती नरेंद्र मोदींच्या शपथविधीला लाभली.

दिग्दर्शक करण जोहर,शाहीद कपूर,कॉमेडियन कपिल शर्मा शपथविधीला उपस्थित होते.

अभिनेता शाहीद कपूर पत्नी मीरा कपूरबरोबर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होता.

First Published on: May 31, 2019 11:30 AM
Exit mobile version