बॉलीवूड कलाकारांनी तनुश्रीला दर्शवला पाठिंबा

बॉलीवूड कलाकारांनी तनुश्रीला दर्शवला पाठिंबा

तनुश्री दत्ता

बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेतली काळी बाजू दाखवणाऱ्या अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या पाठिशी आता इतर कलाकारही भक्कमपणे उभे राहिले असल्याचे दिसून येत आहे. तब्बल दहा वर्षानंतर आपल्यावर झालेल्या अन्यायाला तनुश्रीने दुनियेसमोर उघड करण्याच धाडस केलं असून आता अन्य कलाकारांनीही दिला पाठिंबा दर्शवला आहे. २००८ साली आलेल्या हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता नाना पाटेकर यांनी आपली छेडछाड केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. त्याविरोधात वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. गेल्या काही दिवसात तनुश्रीने थेट मीडियासमोर येत आपली व्यथा मांडली. अखेर आज बॉलीवूड सेलेब्सने ट्विट करत तनुश्रीला समर्थन दिले आहे.

पत्रकार जेनिस स्केरा हिने तनुश्रीला पाठिंबा देताना त्यावेळी तिथेच उपस्थित असल्याचे म्हटले आहे.


जेनिसच्या ट्विटला रिट्विट करताना लेखक, दिग्दर्शक, अभिनेता फरहान अख्तर याने तनुश्रीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. दहा वर्षानंतर तिने ही घटना सांगण्याचे धाडस केले. तिच्या हेतूकडे पाहू नका, धाडसाकडे पाहा, असे त्याने नमूद केले आहे.


प्रियांका चोप्रा हिनेदेखील ट्विट केले आहे.


अभिनेत्री रेणुका शहाणे हिने संताप व्यक्त करत तनुश्रीच्या जागी तुमची मुलगी असती तर काय केल असत असा सवाल केला आहे. रेणुकाने तिच्या फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहून या विषयाबाबत आपले मत मांडले आहे.

नाना पाटेकर देणार उत्तर

अखेर नाना पाटेकर पत्रकार परिषद घेऊन तनुश्री दत्ताच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. आज त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

First Published on: September 29, 2018 4:05 PM
Exit mobile version