मुलांसोबत डान्स करता करता जॉनी लिव्हर यांचा बॅलन्स बिघडला अन्….

मुलांसोबत डान्स करता करता जॉनी लिव्हर यांचा बॅलन्स बिघडला अन्….

मुलांसोबत डान्स करता करता जॉनी लिव्हर यांचा बॅलन्स बिघडला अन्....

बॉलिवूडचे लोकप्रिय कॉमेडियन जॉनी लिव्हर (Johnny Lever) या दिवसात खूप चर्चेत आले आहेत. जरी त्याचे नवे चित्रपट आले नसले तरी ते सोशल मीडियावर व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत आहेत. जॉनी लिव्हर यांच्यासोबत त्यांची मुलगी जॅमी लिव्हर (Jamie Lever) आणि जेस्सी लिव्हर (Jesse Lever) पण सोशल मीडियावर पोस्टमुळे चर्चेत येत आहेत. काही दिवसांपूर्वी जॉनी लिव्हर यांचा मुलांसोबतचा डोन्ट टच मी गाण्यावरील डान्स व्हायरल झाला होता. आता जॅमी लिव्हरने डान्सचा बीटीएस व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जॉनी लिव्हर, जॅमी आणि जेस्सीने वडिलांसोबत डान्स करताना दिसत आहेत. पण यावेळी जॉनी लिव्हर यांचा बॅलेन्स बिघडल्यामुळे ते पडताना दिसत आहे.

जॅमी लिव्हरने हा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून चाहते तुफान त्यावर कमेंट करत आहेत. व्हिडिओमधील तिघांचा अंदाज खूप दमदार आहे.

यापूर्वी कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तयार केलेल्या डोन्ट डच मी या गाण्यावर जॉनी लिव्हर यांनी आपल्या मुलांसह डान्स केला होता. हा डान्सद्वारे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. जॉनी लिव्हर यांचे हे पहिलेच इन्स्टाग्राम रील होते. ‘कोरोनाची लस घेत नाही तो पर्यंत डोन्ट टच मी’ असे कॅप्शन देऊन व्हिडिओ शेअर केला होता.


हेही वाचा – बाबो, राखी सावंत झाली नागीण, व्हिडीओ व्हायरल


 

First Published on: March 11, 2021 4:31 PM
Exit mobile version