Drugs Case: दीपिका पदुकोणच्या एक्स मॅनेजरची अंतरिम जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली

Drugs Case: दीपिका पदुकोणच्या एक्स मॅनेजरची अंतरिम जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली

Drugs Case: दीपिका पदुकोणच्या एक्स मॅनेजरची अंतरिम जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीदरम्यान बॉलिवूडमधील मोठे ड्रग्स कनेक्शन उघड झाले. यानंतर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. यात सारा अली खान, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर अशा अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली. यामुळे या ड्रग्स प्रकरणात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातच या प्रकरणातील दीपिका पदुकोणची एक्स मॅनेजर करिश्मा प्रकाश संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

नारकोटिक्स ड्र्ग्स अँड सायट्रोपिक सब्सटेंस अॅक्ट (NDPS)न्यायालयाने गुरुवारी करिश्मा प्रकाशची अंतरिम जामीन याचिका फेटाळली आहे.मात्र, NDPS चे न्यायाधीश वी. वी विद्वंस यांनी तिला २५ ऑगस्टपर्यंत अंतरिम संरक्षण दिले. त्यामुळे ती मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकते.

करिश्मा प्रकाशला होती अटक होण्याची भीती

ड्रग्ज प्रकरणात सुरू असलेल्या तपासादरम्यान, करिश्मा प्रकाशला अटक होण्याची भीती होती. त्यामुळे तिने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अंतरिम जामीन याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने सुनावणीदरम्यान ही जामिन याचिका फेटाळून लावली. पण या निर्णयाविरोधात करिश्मा मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकते. या प्रकरणात एनसीबी आता ड्रग्स पेडलर आणि बॉलिवूड सेलिब्रिटींमधील कथित संबंधांची चौकशी करत आहे. या प्रकरणाचा उलघडा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर झाला. सध्या या प्रकरणी सीबीआय स्वतंत्र तपास करतयं.

नेमकं प्रकरण काय आहे?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने २७ ऑक्टोबर २०२० रोजी वर्सोवा येथील करिश्मा प्रकाशच्या घराची झडती घेतली. यावेळी त्यांनी करिश्माच्या घरातून १.८ ग्रॅम चरस जप्त केले होते. मात्र यावर करिश्मा प्रकाशने असा दावा केला की, ती या घरात दीर्घकाळ राहत नव्हती. यावर एजन्सीचे म्हणणे आहे की, हे करिश्माचे दुसरे घर आहे.


राज्यातील शेकडो लोककलावंतांना मोठा दिलासा, कलावंतास प्रत्येकी मिळणार ५ हजारांची आर्थिक मदत


 

First Published on: August 5, 2021 10:30 PM
Exit mobile version