अखेर विकी कौशल-कतरिनाचा रोका सोहळा संपन्न, फोटो व्हायरल

अखेर विकी कौशल-कतरिनाचा रोका सोहळा संपन्न, फोटो व्हायरल

अखेर विकी कौशल-कतरिनाचा रोका सोहळा संपन्न, फोटो व्हायरल

बॉलिवूडची बार्बी डॉल अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या अफेअरची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. अशातच विकी-कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाचती समोर आली आहे. ती म्हणजे
कबीर खान आणि मिनी माथूर यांच्या घरी या दोघांचा रोका सोहळा पार पडला. केवळ इतकचं नाही तर दोघं येत्या डिसेंबरपर्यंत लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र लग्नाआधी विकी आणि कतरिनाने छोटेखानी रोका सोहळा ठेवला होता.

विकी-कतरिनाच्या रोका सोहळ्यात केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. ज्यामध्ये कतरिनाची आई सुजैन, तिची बहीण इसाबेल, विकीचे आई-वडील शाम आणि वीणा कौशल आणि भाऊ सनी उपस्थित होते. कतरिनाने यापूर्वीच त्यांच्या साखरपुड्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मात्र रोका सोहळा लग्नाआधीचाच एक विधी असल्याचे म्हटले जाते. कतरिना-विकी मीडियापासून वाचत वेगवेगळ्या कारने सोहळ्यासाठी कबीर खान यांच्या घरी पोहचले. कतरिना कबीर खानाला आपला भाऊ मानते. न्यूयॉर्क आणि एक था टायगर सारख्या चित्रपटात तिने कबीरसोबत काम केले होते. त्यामुळे कबीर आणि मिनी जवळजवळ कतरिनाच्या कुटुंबासारखे आहेत. दिवाळीचा मुहूर्त शुभ मुहूर्तावर दोघांच्या कुटुंबीयांनी रोका सोहळा करण्याचा निर्णय घेतला होता असे म्हटले जाते.

डिसेंबरमध्ये उडणार दोघांच्या लग्नाचा बार

विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबरमध्ये राजस्थानमधील सवाई मोधापूर सिक्स सेंस फोर्टच रिसॉर्टमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र विकी आणि कतरिनाकडून आत्तापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मीडियामध्ये लग्नाच्या बातम्या लीक होत असल्याने कतरिना अधिक नाराज आहे. अशातच विकी आणि कतरिनाने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले. मात्र या फोटोंवरून देखील त्यांनी साखरपूडा केला असा अंदाज बांधला जातोय. दरम्यान दोघं लग्नासाठी विदेशात चांगल्या डेस्टिनेशनचा प्लॅन करत होते मात्र बिझी शेड्यूलमुळे दोघांनी आता राजस्थान हा पर्याय निवडल्याचे म्हटले जातेय. कतरिनाला टायगर 3 चं शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर विकीचे सॅम माणेकशॉच्या बायोपिक सॅम बहादूरवर काम सुरु आहे.


 

First Published on: November 8, 2021 11:30 AM
Exit mobile version