मिशन मंगळ चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्तींची प्रकृती स्थिर

मिशन मंगळ चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्तींची प्रकृती स्थिर

मिशन मंगळ या चित्रपटाचे दिग्दर्शक जगन शक्ती यांच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शनिवारी जगन शक्ती हे अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंरतु डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सुधारत असून ते आता धोक्याबाहेर आहेत. सध्या ते कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या मेंदूत एक गाठ आहे. त्यांच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया शिल्लक आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मिशन मंगळ मधून चित्रपटसृष्टीत केले पदार्पण

जगन शक्ती यांनी २०१९ मध्ये दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मिशन मंगळ या चित्रपटादरम्यान त्यांनी अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू यांच्यासोबत काम केले. मिशन मंगळ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला. याव्यतिरिक्त त्यांनी हॉलिडे, अकिरा, इंग्लिश विग्लिश आणि डियर जिंदगी यांसारख्या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम पाहिले होते.

अक्षय कुमार सोबत आणखी एक चित्रपट 

तसेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते आगामी प्रोजेक्टमध्ये अक्षय कुमार सोबत आणखी एक चित्रपट बनविणार आहेत.  मिशन मंगळनंतर ते कत्थी (Kaththi) या तमिळ चित्रपटाचा रिमेक करण्याच्या विचारात आहेत. परंतु या चित्रपटाविषयी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. २०२१ पर्यंतच्या अक्षय कुमारच्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचे नाव समाविष्ट नाही. मात्र जगन शक्ती बरे झाल्यानंतर कदाचित ते आपल्या पुढील प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करतील.

First Published on: January 28, 2020 8:26 PM
Exit mobile version