बॉलिवूड निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन

बॉलिवूड निर्माते नितिन मनमोहन यांचे निधन

बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते नितिन मनमोहन यांचे आज निधन झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचं सांगितलं जात होत त्यामुळे ते मागील अनेक दिवसांपासून व्हेंटीलेटरवर होते. दरम्यान, आज सकाळी त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.

हृदयविकाराचा आला होता झटका

‘या’ प्रसिद्ध चित्रपटांची केली निर्मिती
नितिन मनमोहन बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट निर्माते होते. त्यांचे वडील प्रसिद्ध अभिनेते होते. नितिन यांनी देखील अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. ‘बोल राधा बोल’, ‘लाडला’, ‘दस’, ‘यमला पगला दीवाना, ‘आर्मी स्कूल’, ‘लव के लिए कुछ भी करेगा’, ‘चल मेरे भाई’, ‘महा-संग्राम’, ‘इंसाफ: द फाइनल जस्टिस’, ‘दीवानगी’, ‘नई पड़ोसन’, ‘अधर्म’, ‘बाघी’, ‘ईना मीना डीका’, ‘तथास्तु’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती.

First Published on: December 29, 2022 1:03 PM
Exit mobile version