‘बालकलाकार ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’, असा होता ऋषी कपूर यांचा प्रवास!

‘बालकलाकार ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’, असा होता ऋषी कपूर यांचा प्रवास!

बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांच्या निधनानंतर ऋषी कपूर यांच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का लागला आहे. ६७ वर्षीय ऋषी कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडकरांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची कर्करोगाची ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांच्या निधनावर चित्रपट सृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५०हून जास्त भूमिका साकारल्या होत्या. यामध्ये त्यांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या. अमिताभ बच्चन यांनी, ते निघून गेले…ऋषी कपूर निघून गेले…मी उदधवस्त झालो आहे. असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केलं आहे.

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ ला मुंबईतील चेंबुरमध्ये झाला. ऋषी कपूर हे राज कपूर यांचा मुलगा आहे. ऋषी कपूर यांना चिंटू या नावाने घरात हाक मारली जायची. रणधीर कपूर आणि राजीव कपूर हे ऋषी कपूर यांचे भाऊ आहेत. हे दोघेही बॉलिवूड स्टार आहेत.

ऋषी कपूर यांनी आपली सुरूवात आपल्या भावांबरोबर कँपियन स्कूलमध्ये मुंबईमध्ये केली आणि त्यानंतर पुढचं शिक्षण अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये केले. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली.

‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून त्यांनी १९७० साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ऋषी कपूर आपल्या त्या काळी चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जायचे. ऋषी कपूर यांच्या संपूर्ण कुटुंबाचे  बॉलिवूडमध्ये मोठे योगदान आहे. ऋषी कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये १०० हून अधिक चित्रपटात काम केले. यादरम्यान अनेक अवॉर्ड आपल्या नावावर केले.

त्यांना १९७४ ला बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. तर २०१८ मध्ये त्यांना फिल्म फेअरचा लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला.

ऋषी कपूर यांन बॉलिवूड अभिनेत्री नीतू सिंग यांच्याबरोबर लग्न केलं होतं. दोघांनी एकमेकांना ५ वर्ष डेट केल्यानंतर लग्ना करण्याचा निर्णय घेतला. त्यांना रणबीर कपूर आणि रिधीमा कपूर अशी दोन मुलं आहेत रणबीर कपूर हा बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता आहे. तर मुलगी रिधीमा कपूरने व्यवसायिक भारत साहनी बरोबर लग्न केलं आहे.

First Published on: April 30, 2020 11:26 AM
Exit mobile version