सुशांत सिंग राजपूतचं इंस्टा अकाऊंट झालं Memorialized! नावापुढे लिहिले…

सुशांत सिंग राजपूतचं इंस्टा अकाऊंट झालं Memorialized! नावापुढे लिहिले…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

इंस्टाग्रामने सुशांत सिंग राजपूतच्या अकाऊंटचे मेमोरियल अकाऊंटमध्ये रूपांतर केले आहे. Remembering हा शब्द आता सुशांतच्या अकाऊंटवर लिहिला गेला आहे. सुशांत इंस्टाग्रामवर वारंवार पोस्ट टाकत राहायचा. सुशांतने ३ जून रोजी इंस्टाग्रामवर आपल्या आईसह एक फोटो शेअर केला होता. त्याने आईची आठवण म्हणून केलेली ही पोस्ट मात्र अखेरची ठरली. त्यानंतर १४ जून रोजी आत्महत्या केली.

मेमोरियल अकाउंट्स म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या जीवनातील आठवणी त्याच्या अकाउंटवरून शेअर केल्या जातात. ज्यामुळे तो व्यक्ती कायम स्मरणात राहण्यास मदत होते. दरम्यान सुशांतच्या निधनानंतर त्याच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढत आहेत. रविवारी त्याच्या फॉलोअर्सची संख्या साधारण ९ मिलियन होती तर सुशांतला १२ मिलियनहून अधिक लोक फॉलो करत आहेत.

काही दिवसांपुर्वी सुशांतच्या टीमने एक वेबसाइटही तयार केली आहे ज्यात त्याने सुशांतचे कार्य, विचार, कोट्स आणि त्याच्या संबंधित काही पोस्ट्स शेअर केल्या जात आहेत. सुशांतच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी आणि चाहत्यांमध्ये टिकून राहण्यासाठी ही वेबसाइट तयार केली असल्याचे सांगण्यात येत आहे.


सुशांत सिंह राजपूतच्या टीमने लॉन्च केली वेबसाइट; आता अभिनेते व्यक्त होणार!

आता सुशांतचे अकाऊंट इतर कोणीही लॉग इन करू शकणार नाही. एकदा अकाऊंट मेमोरियलाइज्ड झाल्यावर,  त्यातील असणाऱ्या पोस्ट किंवा माहिती कोणालाही बदलता येणार नाही. आता सुशांतसिंग राजपूत यांच्या नावाखाली प्रोफाईलमध्ये Remembering हा शब्द दिसून येईल. सुशांतने शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ नेहमीच इंस्टाग्रामवर असतील जे त्यांच्या फॉलोअर्सना केव्हाही बघता येतील.

First Published on: June 19, 2020 11:25 PM
Exit mobile version