Bollywood Valentine: पत्नी गौरीसाठी शाहरूख खान ५ वर्षे हिंदू म्हणून राहिला, नेमक कारण काय ?

Bollywood Valentine:  पत्नी गौरीसाठी शाहरूख खान ५ वर्षे हिंदू म्हणून राहिला, नेमक कारण काय ?

Bollywood Valentine: पत्नी गौरीसाठी शाहरूख खान ५ वर्षे हिंदू म्हणून राहिला, नेमक कारण काय ?

Shah Rukh Khan-Gauri Khan Love Story: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी दुआ केल्याने अभिनेता शाहरुख खान ( Shahrukh Khan)  सध्या चर्चेत आला आहे. खरंतर शाहरुखला सर्व धर्मांविषयी आदर आहे. एकेकाळी पाच वर्षांसाठी शाहरुख पत्नी गौरी खानसाठी हिंदू म्हणून राहिला होता. ऐकून धक्का बसेल मात्र हे खरे आहे.  शाहरुख खान आणि गौरी खान (Gauri Khan)  हे बॉलिवूडमधील फार लव्हिंग आणि हॅपी मॅरिड कपल आहे. दोघांच्या लग्नाला ३० वर्ष झाली आहेत. दोघांची लव्ह स्टोरी आजही चर्चेत आहे. प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये ट्विस्ट हा असतोच. शाहरुख आणि गौरीच्या नात्यातही अनेक चढ उतार आले. परंतु दोघांची कधीही एकमेकांचा हात सोडला नाही. अनेक अडचणी पार करत दोघे आता आयडियल आयुष्य जगत आहेत. मात्र पत्नी गौरीसाठी शाहरुख खान ५ वर्ष हिंदू म्हणून का राहिला? यामागचं कारण काय? जाणून घ्या.

 

शाहरुख आणि गौरीच्या लव्ह स्टोरीविषयी सांगायचे झाले तर, शाहरुख आणि गौरी यांची पहिली ओळख ही एका कॉमन मित्राच्या पार्टीमध्ये झाली होती. शाहरुखने पहिल्यांदा गौरीला पाहिले तेव्हा गौरी एका मुलासोबत डान्स करत होती. गौरीला पाहून तिच्यासोबत आपणही डान्स करावा असे शाहरुखला वाटले होते. मात्र तिच्याशी बोलण्याची त्याची हिंमत काही झाली नाही. कसेतरी करुन शाहरुखने गौरीला डान्ससाठी विचारले तेव्हा तिने नकार देत मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट पाहत आहे असे म्हणाली. खरंतर गौरी ज्या मुलाची वाट पाहत होती तो तिचा भाऊ होता हे शाहरुखला नंतर कळाले.

 

त्यानंतर गौरी आणि शाहरुख यांची ओळख वाढली. शाहरुख गौरीबाबत फार पझेसिव्ह होता. गौरीला मात्र हे अजिबात आवडत नव्हते. दोघांमध्ये एक वेगळे नाते उमलण्यास सुरुवात झाली होती. एक दिवशी शाहरुखने हिंमत करुन गौरीला प्रपोज केले आणि तिथून दोघांची लव्ह स्टोरी खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे.

शाहरुख आणि गौरीने त्यांच्या नात्याविषयी घरच्यांना कल्पना दिली तेव्हा गौरीच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. . दोघांमध्ये कधी धर्म आड आला तर कधी शाहरुखचं करिअर. लग्नासाठी घरच्यांनी नकार दिल्यावरही दोघांनी धीर सोडला नाही आणि १९९१मध्ये लग्नगाठ बांधली. त्यावेळी गौरीच्या परिवाराला पटवण्यासाठी शाहरुख तब्बल ५ वर्ष हिंदू म्हणून राहिली होता. मात्र खरे सर्वांना समजल्यानंतर दोघांनी तीन वेगळ्या पद्धतीने लग्न केले. पहिल्यांदा त्यांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले त्यानंतर मुस्लिम रिवाजानुसार निकाह केल्यानंतर तिसरे लग्न पंजाबी पद्धतीने केले.

लग्नानंतर सर्व काही व्यवस्थित झाले. शाहरुख आणि गौरी एकमेकांवर किती प्रेम करतात हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. शाहरुख आणि गौरी यांच्या सुखी संसारात त्यांनी आर्यन खान, सुहाना खान आणि अब्राम खान अशी तीन मुले आहेत.


हेही वाचा – Urmila Matondar: शाहरुख थुंकला नाही, किंग खानच्या ट्रोलर्सना उर्मिला मातोंडकरांनी सुनावलं

First Published on: February 7, 2022 8:12 PM
Exit mobile version