BMC विरोधातील सोनू सूदची याचिका हायकोर्टानं फेटाळली

BMC विरोधातील सोनू सूदची याचिका हायकोर्टानं फेटाळली

अभिनेता सोनू सूद

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने बांधलेल्या अनधिकृत हॉटेलप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. यासंदर्भात आज गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकेवर आपला निर्णय दिला आहे. सोनू सूदची ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान सोनू सूदने मुंबई महापालिकेविरोधात ही याचिका दाखल केली होती.

दरम्यान, सोनू सूदविरोधात कारवाई करण्याचा आता मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांचाही मार्ग मोकळा झाला आहे. कारण मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदविरोधात जुहू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने सोनू सूदला जी नोटीस पाठवली होती, त्यापुढील कारवाई करण्याचाही मार्ग आता मोकळा झाला आहे.

जुहू येथील निवासी इमारतीच्या बांधकामात बेकायदा बदल करून, त्या इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर केल्याच्या आरोपाखाली मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूदविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. महापालिकेने बजावलेल्या नोटीसविरोधात शहर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करूनही अंतरिम दिलासा मिळू न शकल्याने सोनूने अॅड. धीरेंद्र प्रतापसिंह यांच्यामार्फत अपील केले होते. पालिकेची नोटीस रद्द करावी किंवा तूर्तास त्यावरील कठोर कारवाईला मनाई करावी, अशा विनंतीचा अर्जही त्याने केला. त्यावर ही सुनावणी होती.

असे म्हटले होते याचिकेत…

‘पालिकेची पूर्वपरवानी आवश्यक असलेले कोणतेही बांधकाम बदल इमारतीत केलेले नाहीत. ‘एमआरटीपी’ कायद्यांतर्गत जे बदल करण्यास अनुमती आहे, तेवढेच केले आहेत. पालिकेकडून जागा वापर बदलासाठी परवानगी घेतलेली आहे. आता फक्त ‘सीआरझेड’ची परवानगी मिळणे बाकी आहे,’ असे सोनूने याचिकेत म्हटले आहे.

First Published on: January 21, 2021 11:29 AM
Exit mobile version