‘ब्रह्मास्त्र’वर होणार नाही बहिष्काराचा परिणाम; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये एक लाखापेक्षा जास्त तिकिटांची विक्री

‘ब्रह्मास्त्र’वर होणार नाही बहिष्काराचा परिणाम; अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये एक लाखापेक्षा जास्त तिकिटांची विक्री

अभिनेता रणबीर आणि आलियाच्या आगामी बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सध्या बॉलिवूडमधील अनेक चित्रपट फ्लॉप ठरू लागले आहेत. अशातच आता ‘ब्रह्मास्त्र’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील. याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या ऑडवान्स बुकिंग करण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. शनिवारपासून चित्रपटाच्या ऑडवान्स बुकिंगला सुरूवात झाली होती.

‘ब्रह्मास्त्र’ येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून हिंदी व्यतिरिक्त तो तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होईल. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण भारतात हा चित्रपट 5000 स्क्रिन्सवर दाखवला जाणार आहे. तर इतर देशांतील एकूण 3000 स्क्रिन्सवर दाखवला जाणार आहे.

बहिष्काराच्या मागणीनंतरही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

75 रूपयांमध्ये पाहू शकणार चित्रपट
राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त 16 सप्टेंबर रोजी तिकिटाची किंमत फक्त 75 रूपये असणार आहे. त्यामुळे तुम्ही 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र’ तुम्ही 16 सप्टेंबर रोजी 75 रूपयांमध्ये पाहू शकता.

9 सप्टेंबर रोजी होणार प्रदर्शित
अयान मुखर्जी यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे शुटींग आता पूर्ण झाले असून, आलिया आणि रणबीर, अमिताभ आणि मौनी रॉय या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून येतील. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा : आगामी ‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

First Published on: September 6, 2022 10:35 AM
Exit mobile version