भटाळलेली ‘बकेट लिस्ट’

भटाळलेली ‘बकेट लिस्ट’

बकेट लिस्टमधील माधुरी

माधुरी दीक्षित ही नेने झाल्यावर मोठ्या प्रतिक्षेनंतर मराठी चित्रपटात एकदाची दाखल झाली. माधुरीच्या चित्रपटाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. चित्रपटाचे नाव जाहीर झाले. नाव होते ‘बकेट लिस्ट’. मुळात बकेट लिस्ट हा काय प्रकार आहे. या दोन शब्दांचा नेमका अर्थ काय, हेच बऱ्याच लोकांना कळत नव्हते. त्यामुळे बरेचजण गोंधळात पडले की, हा नेमका काय प्रकार आहे. या चित्रपटाची प्रदर्शनपूर्व जोरदार प्रसिद्धी करण्यात आली. चित्रपट एकदाचा प्रदर्शित झाला. त्या चित्रपटातसुद्धा माधुरी आणि तिच्या कुटुंबातील मंडळींना बकेट लिस्ट म्हणजे नेमका काय प्रकार आहे हे कळत नसते. त्यानंतर माधुरीची मुलगी तिला समजावून सांगते की, बकेट लिस्ट म्हणजे आपल्याला भावी काळात ज्या इच्छांची पूर्ती करायची आहे, त्यांची लिस्ट.

चित्रपटात माधुरी दीक्षित असल्यामुळे मराठी प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. त्यात पटकथाही अवयवदानासारख्या संवेदनशील आणि सामाजिक संदेश देणाऱ्या विषयावर आधारलेली होती. या चित्रपटाची सुरुवातच जेवणाचा पहिला घास घ्यायला जावे आणि जेवणात माशी पडावी, अशा प्रकारे झाले. माधुरी दीक्षित आपल्या स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत असते, तिचा पहिलाच डायलॉग असा आहे. ती घरकाम करणाऱ्या बाईला म्हणते, ‘शांता त्या फूलपात्राला हात नको लावूस. ते सोवळ्याचं आहे’. खरे तर पुण्यातील वेधशाळेच्या माजी उपमहासंचालिका मेधा खोले यांचे सोवळ्याचे प्रकरण महाराष्ट्रात अलीकडेच गाजले होते. त्यांनी आपल्याकडे घरकाम करणाऱ्या बाईने सोवळे मोडल्याचा आरोप करून पोलिसात तक्रार केली होती. त्यावरून त्यांची आणि सोवळ्या भटाळ प्रवृत्तीची सगळीकडून छि-थू झाली होती.

बकेट लिस्टमधील माधुरीचे सगळे कुटुंबच सोवळ्यात बरबटून गेलेले दिसते. त्या सोवळ्यातून बाहेर पडून माधुरीला जिचे हृदय मिळलेले असते, त्या किशोरवयीन मुलीच्या बकेट लिस्टमधील इच्छा पूर्ण करायच्या असतात. दोन मुलांची आई असलेली गृहिणी माधुरी किशोरवयीन मुलगी होण्याचा आटापिटा करते. त्यासाठी ती तिच्या घरातील टिपिकल सोवळ्या ब्राम्हणी वातावरणाला छेद देण्याचा प्रयत्न करते. चित्रपट पाहताना त्या कुटुंबाचे तांब्याच्या ताटांमध्ये जेवण्यापासून ते एकूणच भटाळलेल्या गोष्टी पाहताना अक्षरश: गळ्याशी येते आणि ओकारी यायचे बाकी राहते. डोके दुखायला लागते. त्यामुळे तिकीट काढल्यावर नाइलाज म्हणून ती भटाळलेली बकेट लिस्ट पहावी लागते.

First Published on: May 28, 2018 10:03 AM
Exit mobile version