Sushant Suicide Case: सुशांतचा केअर टेकर आणि रुममेट होणार माफीचे साक्षीदार?

Sushant Suicide Case: सुशांतचा केअर टेकर आणि रुममेट होणार माफीचे साक्षीदार?

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याच्या घटनेला बरेच दिवस उलटून गेले तरी अद्याप त्याच्या या घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणासंदर्भात सीबीआयने बऱ्याच जणांची चौकशी केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, विशेष म्हणजे यात सुशांतचा केअर टेकर दिपेश सावंत आणि सिद्धार्थ पिठानी माफीचे साक्षीदार होण्यास तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तपासकार्यात दोघांची होणार मदत 

सीबीआयचा तपास सुरू असताना या तपासात दिपेश सावंत हा सुशांतचा केअर टेकर असल्याने त्याला महत्त्वाचे मानले जात आहे. या केअऱ टेकरसह सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानी असल्याने हा देखील महत्त्वाचा व्यक्ती असल्याने या दोघांनीही सीबीआय तपासादरम्यान महत्त्वाची माहिती दिल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे या प्रकरणाच्या तपासकार्यात त्यांची मदत होणार असून या कारणास्तव ते माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर दिपेश काही वेळ गायब 

मिळालेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी रिया आणि सुशांतचे जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर रियाने ८ हार्ड ड्राइव्ह नष्ट केल्या आणि ती घरातून निघून गेली, असे दिपेश आणि सिद्धार्थने सांगितले आहे. तसेच सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादिवशी दिपेश आणि सिद्धार्थ घरीच होते. तर सुशांतच्या मृत्यूनंतर दिपेश काही वेळ घरातून गायब होता. असे देखील सांगण्यात येत आहे.

सध्या दिपेश सीबीआय DRDO गेस्ट हाऊसमध्ये असून त्याला बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर सीबीआयपूर्वी दिपेशची मुंबई पोलिसांनी तीनदा आणि ईडीने दोन वेळा चौकशी केली आहे. त्यानंतर आता सीबीआय या प्रकरणी चौकशी करत आहेत.


Sushant Singh Rajput Case: रिया चक्रवर्ती आपली वक्तव्ये का बदलतेय? कारण आले समोर

First Published on: August 29, 2020 10:39 AM
Exit mobile version