सुशांतची बहिण मीतू सिंहची CBI चौकशी, तर ED समोर हजर होणार गौरव आर्या

सुशांतची बहिण मीतू सिंहची CBI चौकशी, तर ED समोर हजर होणार गौरव आर्या

अभिनेता सुशांत सिंह राजपूत

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रोज नवीन खुलासे समोर येत असून याप्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. दररोज नवीन नावे समोर येत असून आज सीबीआयने सकाळी ११ वाजता सुशांतची बहिण मीतू सिंहला चौकशीसाठी बोलावले आहे. मीतू सिंहची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशी करण्यात येणार आहे. तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी गौरव आर्यची देखील आज ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. गौरव आर्यला आज सकाळी ११ वाजता ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.

मीतूला क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी बोलावले

मीतू सिंहची सीबीआय चौकशी केली जाणार असून मीतू सिंहला रियाने केलेल्या दाव्याच्या क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आले आहे. तसेच सुशांतच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. तसेच मीतू सिंहकडून सीबीआय पथक ८ जूनपासून ते १२ जूनपर्यंतच्या घटनांबाबत जाणून घेणार आहे.

सुशांतची बहिण प्रियांका आणि तिच्या पतीचीही चौकशी

मीतू सिंह व्यतिरिक्त सीबीआय फरीदाबादमध्ये राहणारी सुशांतची बहिण प्रियांका आणि तिच्या पतीचीही चौकशी केली जाणार आहे. या दोघांची चौकशी सीबीआयचे दिल्लीतील पथक करणार आहेत. तसेच गरज पडल्यास सुशांतच्या दोन्ही बहिण, रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठानी, नीरज, दीपेश यासर्वांना समोरासमोर बसवून सीबीआयचे पथक प्रश्न विचारू शकते. सुशांतची बहिण मीतू ८ जून ते १२ जूनपर्यंत आपल्या भावासोबत होती. त्यामुळे तिला या पाच दिवसांचा घटनाक्रम विचारण्यात येणार आहे.

गौरव आर्यचीही चौकशी

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी गौरव आर्यची आज ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. गौरव आर्यला आज सकाळी ११ वाजता ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. गौरव आर्यने रविवारी गोव्याहून मुंबईसाठी निघताना सांगितले होते की, ‘तो २०१७ मध्ये रिया चक्रवर्तीला भेटला होता. त्यानंतर तो रियाला भेटला नाही. तसेच सुशांत सिंह राजपूतला तो केव्हाच भेटला नसल्याचेही त्याने सांगितले आहे. दरम्यान, गौरव आर्य एअरपोर्टवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना टाळताना दिसून आला आहे’.


हेही वाचा – अध्यक्ष निवडीची घाई नाही, आभाळ कोसळत नाहीये


 

First Published on: August 31, 2020 9:30 AM
Exit mobile version