भाईजानच्या ‘राधे’च्या ट्रेलरचा धुमाकुळ, चित्रपट प्रदर्शित करण्याचा नवा मार्ग पाहा

भाईजानच्या ‘राधे’च्या ट्रेलरचा धुमाकुळ, चित्रपट प्रदर्शित करण्याचा नवा मार्ग पाहा

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे आदेशही देण्यात आले. मात्र त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सिनेसृष्टीलाही याचा मोठा फटका बसला होता. चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक चित्रपटांना आपली प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. मात्र सलमान खानच्या चाहत्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला चित्रपट ‘राधे: यॉर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. गुरुवारी २२ एप्रिल रोजी हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. ‘राधे: यॉर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचा ट्रेलर ‘सलमान खान फिल्म्स’ या युट्युब चॅनलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच या व्हिडिओसा लाखो लोकांनी पाहिला आहे. प्रेक्षकांचा या ट्रेलरला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

सलमाननेही स्वत: त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे हा ट्रेलर शेअर करत एक पोस्ट केली आहे. खरतर ‘राधे: यॉर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट गेल्या वर्षी रमजान ईदच्या मूहुर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे मागच्या वर्षीदेखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ठकलण्यात आली . आता या वेळेस हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे.


हे वाचा-  मालदीवला वॅकेशनसाठी गेलेल्या सेलिब्रिटींवर श्रुती हसनचा संताप

First Published on: April 22, 2021 1:41 PM
Exit mobile version