मुलांची पावसात अशीही मजा

मुलांची पावसात अशीही मजा

अभिनेता विवेक ओबेरॉय (सौजन्य - इन्स्टाग्राम)

गेले तीन दिवस सतत पडणाऱ्या पावसाची सगळीकडेच सध्या चर्चा आहे. तर ठिकठिकाणी असलेल्या भयानक परिस्थितीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी भरलं आहे. मात्र, या सगळ्यात लहान मुलांची मस्ती आणि त्यांचं बालपण जपणारा असा एक व्हिडिओ अभिनेता विवेक ओबेरॉयनं आपल्या इन्स्टावरून पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही वाटेल परत लहान व्हावं.

मजेशीर बालपणीची मस्ती

अभिनेता विवेक ओबेरॉयनं आपल्या इन्स्टावरून लहान मुलाचा पावसात खेळताना एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये हा मुलगा टायरमधून रोल होत कशी मस्ती करतोय हे समोर येत आहे. भर पावसात टायरमधून रोल करत पुन्हा हा मुलगा आपल्या पहिल्या जागेवर येतो. तसं करत असताना त्याला स्वतःला येणारी मजा समोरच्यालाही आनंद देऊन जात आहे. ‘हा मुलगा खरं तर रोल करत आहे. सुरुवातीला याला पाहिल्यानंतर मला काळजीच वाटली. पण नंतर मला जाणवलं की, ही तर लहानपणीची मस्ती आणि निरागसतेचं एक उदाहरण आहे.’ असं कॅप्शन या व्हिडिओला विवेकनं दिली आहे. पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहताना नक्कीच या मुलाची काळजी वाटते. मात्र नंतर बालपण आठवल्याशिवाय राहात नाही.

विवेक ओबेरॉयच्या इन्स्टावर नेहमीच मजेशीर व्हिडिओ

असा मजेशीर व्हिडिओ पोस्ट करण्याची विवेकची ही पहिलीच वेळ नाही. आपल्या इन्स्टावर चाहत्यांसाठी नेहमीच विवेक असे वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतो. सध्या विवेक ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिलालिटी शो मध्ये परीक्षक असून त्याचा कोणताही नवा चित्रपट आलेला नाही.

 

First Published on: July 10, 2018 12:22 PM
Exit mobile version