ही कलियुगातील रावण… उर्फीचा नवा लूक पाहून चाहत्यांची कमेंट

ही कलियुगातील रावण… उर्फीचा नवा लूक पाहून चाहत्यांची कमेंट

आपल्या अतरंगी स्टाईलमुळे सतत चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या अनोख्या स्टाईलचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकजण तिच्या हटके स्टाईलचं कौतुक करतात तर काहीजण तिला प्रचंड ट्रोल देखील करत असतात. मात्र, उर्फी कोणालाही न घाबरता सडेतोड उत्तर देताना दिसते. दरम्यान अशातच, उर्फीचा आणखी एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये उर्फीने एक नव्हे तर अनेक चष्मे घातलेले आहेत.

उर्फीचा आगळावेगळा लूक चर्चेत

दरम्यान, उर्फीला ‘बिग बॉस ओटीटी’मधून प्रसिद्धी खरी मिळाली. उर्फी ही बिग बॉसमध्ये फार काळ नव्हती. पण, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर उर्फीने वेगळ्या फॅशन सेन्सने सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर उर्फीला सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली.


हेही वाचा : Photo : रणवीर-दीपिकाचं ब्लॅक आऊटफिटमध्ये जबरदस्त फोटोशूट

First Published on: October 25, 2023 1:30 PM
Exit mobile version