कानभट वेद , विज्ञान यांचा समन्वय

कानभट वेद , विज्ञान यांचा समन्वय

Kanbhatt_Ved_Vidnynan_yancha_samanway

कितीतरी अमराठी निर्माते आहेत की ज्यांनी हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यापूर्वी मराठी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. असेही काही निर्माते आहेत की ज्यांनी अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर दिग्दर्शक म्हणून स्वत:ला आजमावण्यासाठी मराठी चित्रपटाला स्वीकारलेले आहे. अपर्णा एस हाऊशिंग ही अशी निर्माती आहे की जी उरपटांग, दशहरा, जिना है तो ठोक डाल अशा कितीतरी हिंदी चित्रपटांच्या निर्मितीत सक्रिय होती.

निर्मिती प्रक्रियेत जो काही अनुभव आला त्याबळावर तिने मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. कानभट हे तिच्या नव्या मराठी चित्रपटाचे नाव आहे. याच वर्षात हा चित्रपट तिने प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवकलाकारांकडून हव त्या पद्धतीने काम करून घेता येते यावर तिचा विश्वास आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका भाव्या शिंदे यांनी साकार केलेली आहे. गाणी गुरू ठाकूर यांची असून, ती संगीतबद्ध केली आहेत राहुल रानडे यांनी. ही कथा काही दशकांपूर्वीची आहे. त्याला साजेल असे वातावरण निर्माण व्हावे यासाठी भोर राजवाडा, उत्तराखंड येथे तर काही प्रसंग मुंबईत चित्रीत केलेले आहेत.

पूर्वापार चालत आलेले वेद आणि आताची वैज्ञानिक प्रगती यांचा समन्वय या कथेत साधण्याचा अपर्णा यांनी प्रयत्न केलेला आहे. मराठीतला हा पहिलाच चित्रपट खास व्हावा यासाठी तिची धडपड आहे. मराठीतला प्रेक्षक फक्त मनोरंजनाचा चाहता नाही तर चांगल्या कलाकृतीचाही भूकेला आहे याची जाणीव ठेवून अपर्णाने हा चित्रपट तयार केलेला आहे.

First Published on: April 26, 2019 4:05 AM
Exit mobile version