करोना व्हायरसचा सुबोध भावेला फटका!

करोना व्हायरसचा सुबोध भावेला फटका!

अभिनेता सुबोध भावे

चीन नंतर जगभरातच करोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात करोनाची सध्या दहशत पसरली आहे. भारतात करोना व्हायरसचे ६० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात ३० करोना रुग्ण संशयित आढळले आहेत. तर पुण्यामध्ये काल पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. करोनाचे सावट असल्यामुळे सध्या मोठ मोठे कार्यक्रम देखील रद्द केले जात आहेत. तसंच आता मराठी नाटकाचे अमेरिकेतील दौरे देखील रद्द केले जात असल्याचं समोर येत आहे. अभिनेता सुबोध भावे याचं ‘अश्रृंची झाली फुले’ या नाटकाला करोना व्हायरस फटका बसला आहे. या नाटकाचे अमेरिकेत दौरे रद्द केले असल्याचं सुबोध भावे याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे.

‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाचे २५ मार्च ते २६ एप्रिल दरम्यान अमेरिकेत प्रयोग होणार होते. मात्र करोनाच्या व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नाटकाचे प्रयोग पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये होणार आहेत.

तसंच त्याने नाटकाच्या प्रयोग संदर्भात माहिती दिल्या नंतर करोना संदर्भात संताप व्यक्त केला आहे. एका बाजूला करोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे, मात्र दुसऱ्या बाजूला म्हणजेच सोशल मीडियावर सध्या करोनासंदर्भात मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासंदर्भात सुबोध भावेने ट्विट केलं आहे. ‘करोना हा काही विनोदाचा विषय नाही. सगळंच भान सोडण्याच्या काळात किमान ज्यांचा जीव गेलाय त्यांच तरी भान बाळगूया. स्वतःची आणि इतरांचीही काळजी घ्या आणि सुरक्षित रहा’, असं त्याने ट्विट केलं आहे.


हेही वाचा – ‘या’ कारणांमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर रंगली विकी कौशलची चर्चा


 

First Published on: March 11, 2020 5:03 PM
Exit mobile version