CoronaVaccination:बॉलिवूड कलाकारांनी घेतला कोरोना लसीकरणाचा पहिला डोस

CoronaVaccination:बॉलिवूड कलाकारांनी घेतला कोरोना लसीकरणाचा पहिला डोस

CoronaVaccination:बॉलिवूड कलाकारांनी घेतला कोरोना लसीकरणाचा पहिला डोस

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत असून अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील या सुविधेचा लाभ घेतला आहे. अभिनेता रितेश देखमुख तसेच जेनेलीया देशमुख, सोनाक्षी सिन्हा यांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला असल्याचे सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. रितेश आणि जेनीलियाने ट्विट करत लिहलं आहे की, ‘लसीकरण करा !!! चला या राक्षसाबरोबर लढूया’

तसेच सोनाक्षीने कोरोनाची लस  घेतांना फोटो पोस्ट करून त्याला कॅप्शन दिलं आहे की,” वाक्सिन म्हणजे विक्ट्रि(Victory)” काही दिवसांपूर्वी मलायिका अरोरा,अमिताभ बच्चन,सोनू सुद,अनुराग कश्यप यांनी देखील कोरोना लसीकरण केले होते.

देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसगणिक वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले असून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे. मागील काही दिवसांपासून ४ लाखांहून अधिक कोरोनाबाधितरुग्णांची नोंद होत होती, मात्र आज कोरोनाबाधितरुग्णांच्या संख्येत किचिंत घट झाली असून ३ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लसीकरणावर अधिक भर देण्यात आला आहे. एकीकडे लोकांमध्ये कोरोना लसीकरणा बाबत मनात असंख्य प्रश्न,संभ्रम निर्माण होत असताना दुसरीकडे मात्र लोकांची भीती घालवण्याकरिता अनेक कलाकार लसीकरणाचे महत्व पटवून देत आहेत


हे हि वाचा – ‘मिशन: इम्पॉसिबल’च्या सेटवर घुसखोरांचा हल्लाबोल,टॉम क्रूझने केला कडक पोलीस बंदोबस्त

First Published on: May 10, 2021 3:26 PM
Exit mobile version