करण जोहर कुटुंबाबरोबर क्वारंटाईन, घरातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

करण जोहर कुटुंबाबरोबर क्वारंटाईन, घरातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलिवूडमध्ये देखील कोरोनानं शिरकाव केला आहे. बॉलिवूडमध्ये काही कलाकारांना तर काही कलाकारांच्या कर्माचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बोनी कपूर यांच्या घरी असलेल्या कर्माचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त असतानाच आता निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या घरीदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्याच्या घरात काम करणाऱ्या २ कर्मचाऱ्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांनी त्यांचे घर आणि आसपासचा परिसरात जंतुनाशक फवारणी केली आहे.

करण जोहरने याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. करणने लिहीलं आहे की, या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसताच त्यांना त्याच इमारतीत बनवलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. यानंतर इमारतीत सेनिटायझेशन केलं गेलं. पालिकेनं सर्व खबरदारीचे उपाय केले आहेत. करण जोहरने उर्वरित घरातील माणसं सुरक्षित असल्याची माहिती दिली. सोमवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांच्या स्वॅब चाचण्या केल्या. सर्वांच्या चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. असं असलं तरीही पुढील १४ दिवस कुटुंबातील सर्व सदस्य क्वारंटाईन राहतील.

करण जोहरनं आपला ४८ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूड स्टार्सनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी आलिया भट्टनं दिलेल्या शुभेच्छांच कौतुक सगळ्यांनी केलं. तिनं आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर करण जोहरचे एक चित्र शेअर केले आणि त्याचं मित्र, वडील आणि कुटुंबीय म्हणून वर्णन केलं.


हे ही वाचा – अमिताभ यांच्या लूकमुळे ‘गुलाबो सिताबो’ वादात


 

First Published on: May 26, 2020 7:56 AM
Exit mobile version