CoronaVirus – तर सगळ्यांनाच १०० रूपयाची ताकद समजेल – आशा भोसले

CoronaVirus – तर सगळ्यांनाच १०० रूपयाची ताकद समजेल – आशा भोसले

कोरोनाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. त्यामुळे आता देशाच्या आर्थिक मदतीसाठी सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनीच मदतीचा हात पुढे केला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉकडाऊन करण्यात आलं असलं तरी हातावरचं पोट असणाऱ्यांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय आणि दोन वेळच जेवण मिळणंही कठीण होऊन बसलंय. अशा परिस्थितीत अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केलाय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही मदतीचं आवाहन केलंय. पण यावेळी त्यांनी सांगितलेली आयडीयाही फार भन्नाट आहे.

आशा भोसले म्हणाल्या, प्रत्येकाने किमान १०० रूपये पंतप्रधान मदत निधीला घ्यायला हवेत. असं अशा भोसलेंनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. देशातल्या १३० कोटी देशवासियांनी जर प्रत्येकी १०० रूपयांची मदत केली तर १३००० कोटी आपण उभे करू शकतो. प्रत्येकालाच १०० रूपयाची ताकद समजेल.

बॉलिवूडकरांचाही मदतीचा हात

अभिनेता अजय देवगण, चित्रपट निर्माता रोहीत शेट्टी यांनी देखील ५१ लाखांचा निधी मदत म्हणून दिला आहे. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कलाकारही कामगारांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. तर दुसरीकडे अभिनेता सलमान खानंही FWICE कडे २५ हजार कामगारांचे अकाउंट नंबर मागितले आहेत. याद्वारे थेट त्यांच्या खात्यात रक्कम टाकण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अक्षय कुमारनंही पंतप्रधान मदत निधीमध्ये २५ कोटी रूपयांचा निधी दिला आहे. कार्तिक आर्यन,  अनुष्का शर्मा, प्रभास, अल्लू अर्जुन, पवनकल्याण, कपिल शर्मा, वरुण धवन, करण जोहर, आयुषमान खुराना, गुरु रंधावा आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांनीही ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला देणगी दिली आहे.

First Published on: April 7, 2020 7:58 PM
Exit mobile version