‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिका दिसणार आता दूरदर्शनच्या नव्या चॅनेलवर!

‘रामायण’, ‘महाभारत’ या मालिका दिसणार आता दूरदर्शनच्या नव्या चॅनेलवर!

रामायण पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या वेळ आणि दिवस

लॉकडाऊनमध्ये दूरदर्शनवरील ‘रामायण’, ‘महाभारत’ सारख्या जून्या मालिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता प्रसार भारतीने जुन्या मालिका पुन्हा दाखवण्यासाठी एक नवी वाहिनीची सुरूवात केली आहे. डीडी रेट्रो असं या नवीन वाहिनीचं नाव आहे.

रामायण आणि महाभारता शिवाय चक्रांत द्विवेदी दिग्दर्शित ‘चाणाक्य’, अभिनेते मुकेश खन्ना यांची पहिला भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’ मालिका, कॉमेडी मालिका ‘श्रीमान श्रीमती’, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची ‘सर्कस’, ‘ब्योमन बाकक्षी’, ‘हम है ना’, ‘तू तोता मै मैना’ आणि ‘देख भाई देख’ या जून्या मालिका आता दूरदर्शनच्या नवीन डीडी रेट्रो वाहिनीवर बघायला मिळणार आहे. ही वाहिनी सगळ्यांना मोफत दाखवण्यात येणार आहे. ००३ या क्रमांकावर ही वाहिनी दिसणार आहे. डीडी रेट्रो लवकरच इतर केबल सुविधांवर देखील दिसणार आहे.

९० च्या काळात रामायण सुरू झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा हे आपण ऐकले आहे. पण हीच रामायणाची क्रेझ आजही आहे. याचा अनुभव २०२० मधील प्रेक्षकांनीही घेतला. टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकले आहे आणि  टीआरपीचे सर्व विक्रम मोडीले आहेत. २१ ते २७ मार्च या काळात हिंदी मनोरंजनाच्या वाहिन्यांमध्ये डीडी पहिल्या १० मध्ये देखील नव्हते, पण २८ मार्च ते ३ एप्रिल या आठवड्यात डीडी वाहिनी सारे विक्रम मोडीत काढत अव्वल स्थान पटकावले आहे.


हे ही वाचा – एक नंबर!!! आजही ‘रामायण’ प्रेक्षकांमध्ये हीट, पुन्हा रचला तोच इतिहास!


 

First Published on: April 13, 2020 4:15 PM
Exit mobile version