रस्त्यावर न्यूड फोटो शूट करणं पडलं महागात, व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल!

रस्त्यावर न्यूड फोटो शूट करणं पडलं महागात, व्हिडिओ सोशल मीडियावर झाला व्हायरल!

कोरोना व्हायरसपासून मुक्तता मिळवण्यासाठी भारतासह अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. आता लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात अनेक देशात लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले आहेत. मात्र तरीही सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य आहे. मात्र मास्क न वापरता न्यूड मॉडेल इवा मारियानला फोटोशूट करणं महागात पडलं आहे.

न्यूड मॉडेल इवा मारियानं लॉकडाऊनमध्येच फोटोशूट करण्याचं ठरवलं. आजपर्यंत अनेकवेळा इवा नेहमी स्टेडियम, सार्वजनिक ठिकाणी किंवा धार्मिक स्थळांवर ‘न्यूड फोटोशूट्स’ केल्यामुळे वादात सापडली आहे. यावेळी पण तीने लॉकडाऊनचे उल्लंघन करीत परवानगी न घेता प्रसिद्ध फुटबॉल स्टेडियमसमोर न्यूड फोटोशूट केलं. मात्र, पोलिसांनी तिला मास्क न घातल्यामुळं तिला दंड ठोठावला आहे.

पोलिसांनाच केलं ट्रोल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मारिया न्यूड फोटोशूट करताना दिसत आहे. दरम्यान, पोलिस तेथे पोहोचले आणि मारिया आणि तिच्या फोटोग्राफरशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद होता मारियानं मास्क वापरला नाही म्हणून. जेव्हा मारियाला फेस मास्क न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला, तेव्हा सर्वांना धक्का बसला. पोलिसांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांनी पोलिसांना ट्रोल केलं आहे.

मॉडेलवर मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यामुळे ३४७ रुबल दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी असे स्पष्ट केले आहे की न्यूड फोटोशूट काढणं हे गुन्हेगारीच्या प्रकारात नाही म्हणून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार नाही. असे स्पष्टिकरण पोलिसांनी दिलं आहे.


हे ही वाचा – धक्कादायक! नवऱ्याने मित्रांना बोलवून बायकोवर केला बलात्कार


 

First Published on: June 5, 2020 11:38 PM
Exit mobile version