CoronaVirus – ‘नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त…’

CoronaVirus – ‘नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त…’

कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात आणि देशात वाढतच चालला आहे. त्यामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. आधी १४ एप्रिलपर्यंत असणारा हा लॉकडाउन आता ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या काळात कुणीही घराबाहेर पडू नका असंही आवाहन करण्यात आलं आहे. अगदी मोठ्या उद्योजकांपासून, सेलिब्रिटींपासून ते सामान्य माणसांपर्यंत सगळे घरातच आहेत. या सगळ्या वातावरणाला उद्देशून संगीतकार सलील कुलकर्णी यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

काय आहे पोस्टमध्ये

नियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त……माझ्या एक एक तासाची किंमत आहे असं उर्मट चेहऱ्याने सांगणारे ……पुढच्या महिन्यात फोन करून पाहा…हा महिना तर अगदी ओव्हर पॅक आहे म्हणणारे……पुढच्या दोन महिन्यात सहा देशांत फिरणार आहे असं मिरवणारे….तुला बघुन घेतो मी ,तुझ्या गावात येऊन घरात घुसतो असा दम भरणारे….मी फोन उचलत नाही हो…सतत meetings असतात ऑफिस मध्ये आमच्या.. असा दावा करणारे……माझ्या एका हाकेवर दहा हजार लोक जमा होतील असं गरजणारे …दर काही दिवसांनी ऑफिस ची टूर आहे सांगून बाहेरख्याली पणा करून फसवणारे…सगळे थांबले…शांत….एका रांगेत..तोंड झाकून…अंतर राखूननियती नावाची मावशी उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर एकदाच वळली फक्त……सलील कुलकर्णी.

या पोस्टमधून आपल्याकडे वेळ नाही, आपण खूप कामात आहोत,  आपण सगळं काही साध्य करु शकतो असा दावा करणाऱ्या सगळ्यांनाच सलील कुलकर्णीने फैलावर घेतलं आहे. करोना नावाच्या एका व्हायरसने सगळ्यांचं आयुष्य कसं बदलून टाकलं आहे हे सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे. नियतीने एक कुस बदलली आणि काय घडलं ? ते आपण पाहतो आहोत. मोठमोठे दावे करणारे, गर्व करणारे, बिझी आहोत सांगणारे आज शांत बसले आहेत किंवा रांगेत उभे आहेत. माझ्या एका हाकेवर दहा हजार लोक जमा होतील असं गरजणारे, दर काही दिवसांनी ऑफिस ची टूर आहे सांगून बाहेरख्याली पणा करून फसवणारे सगळं थांबले शांत एका रांगेत, तोंड झाकून अंतर राखून असं सलील कुलकर्णींनी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

First Published on: April 14, 2020 4:31 PM
Exit mobile version