Video: Coronavirus करोनामुळे सोनमने सासूशी साधला खिडकीतून संवाद!

Video: Coronavirus करोनामुळे सोनमने सासूशी साधला खिडकीतून संवाद!

सोनम कपूर

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी सुरू आहे. अशा व्यक्तींना काही दिवसांसाठी आयसोलेटेड एरियामध्ये ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद खोलीत राहण्याचे सांगितले आहे. सोनमप्रकारे बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी स्वत:ला घरातच कोंडून घेतले आहे. अनेकांनी घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.

नुकतीच सोनम कपूर लंडनहून परत आली आहे. त्यामुळे तीने कोरोनापासून बचावासाठी स्वत:ला तिच्या घरी एका बंद खोलीत बंदिस्त करून ठेवले आहे. त्यामुळे सध्या ती कोणाच्याच संपर्कात नाही. नुकताच सोनमच्या घरातील एक व्हीडिओ समोर आला आहे. सोनम तीच्या सासूशी खिडकीमधून बोलताना या व्हीडिओत दिसत आहे. पहिल्या मजल्यावर सोनमची रूम आहे. तर समोर तळमजल्याला सोनमच्या सासूची रूम आहे. त्यामुळे या दोघी खिडकीमधून एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्न ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत सोनमने आपल्या चाहत्यांसह आंनदाचे सगळे क्षण शेअर केले होते. सोनम सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असल्याने सोनमने सोशल मीडियावर तिचे नाव बदलून ‘सोनम कपूर आहुजा’ असे केले आहे. लवकरच सोनम आई होणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. याचमुळे कदाचीत सोनम जास्त काळजी घेताना दिसत आहे.

First Published on: March 19, 2020 3:34 PM
Exit mobile version