Coronavirus : सोनू निगमला कोरोनाची लागण ; पत्नी आणि मुलगाही पॉझिटिव्ह

Coronavirus : सोनू निगमला कोरोनाची लागण ; पत्नी आणि मुलगाही पॉझिटिव्ह

Coronavirus : सोनू निगम कोरोनाच्या विळख्यात ; पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा देशभरात धुमाकुळ सुरु आहे. ओमिक्रॉन या नव्या विषाणूचा प्रसार वेगाने होत असून, बॉलीवूडसुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. बॉलीवूडचा सर्वात प्रसिद्ध गीतकार सोनू निगम याला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय त्याची पत्नी आणि मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सोनू निगमने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून कोविड पॉझिटिव्ह असल्याची त्याने माहिती दिली आहे.’मला भुवनेश्वरमध्ये परफॉर्म करण्यासाठी आणि सुपर सिंगर सीजन 3 शूटिंगसाठी भारतात जायचे होते. त्यासाठी त्याने आपली कोविड चाचणी केली. या चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले’,असे त्याने व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

मला असे वाटते लोकांनी कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे. या अगोदर वायरल इंन्फेक्शन आणि गळा खराब असूनही मी अनेकवेळा कॉन्सर्ट केले आहेत. मात्र मला कोरोनाची लागण झाली असून,माझी तब्ब्येत ठीक आहे.याशिवाय माझा गळासुद्धा इतका खराब झाला नाही.पण मला माझ्यासोबत असणाऱ्यांना हानी पोहोचवायची नाही.त्यामुळे या कोरोनाच्या लाटेत जितके लोक बाधित होत आहेत. हे पाहून कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे,असे सोनू निगम याने म्हटले आहे.

मराठी सिनेसृष्टीत कोरोनाचा शिरकाव! 

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात आहेत मात्र आता कोरोनाने मराठी सिनेसृष्टीतही शिरकाव केला आहे. मराठी अभिनेता अंकुश चौधरीला कोरोनाची लागण झाली आहे. ( Ankush Chaudhari corona Positive ) अंकुशने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. अंकुशवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत. अंकुशने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा जोशाने सुरू झाली होती. मराठी कलाकार त्यांची काळजी घेऊन शुटींग करत होते. मात्र कोरोनाने मराठी कलाकारांनाही निशाणा बनवत मराठी सिनेसृष्टीत शिरकावा केला आहे.


हेही वाचा – Prithviraj Postponed: आरआरआर पाठोपाठ अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज’ सिनेमाही पुढे ढकलला


 

 

First Published on: January 5, 2022 10:10 AM
Exit mobile version