Raj Kundra pornography case : केवळ ५० हजार नाही तर ‘या’ अटीवर राज कुंद्राला मिळाला जामीन

Raj Kundra pornography case : केवळ ५० हजार नाही तर ‘या’ अटीवर राज कुंद्राला मिळाला जामीन

केवळ ५० हजार नाही तर 'या' अटीवर राज कुंद्राला मिळाला जामीन

पॉर्नोग्राफी केसमधून बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राची दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवारी तुरुंगातून जामिनावर सुटका झाली. पॉर्न फिल्म निमिर्ती करत ते प्रदर्शित केल्याप्ररकणी तो गेली २ महिने तुरुंगात होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी ५० हजारांच्या जात मुचकल्यावर राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रायन थोर्पे याचा जामीन मंजूर केला.

केवळ ५० हजार नाही तर न्यायालयाने एका अटीवर राज कुंद्राचा जामीन मंजूर केला आहे. ती अट म्हणजे या प्रकरणाशी या प्रकरणाशी संबंधित पुराव्यांशी छेडछाड न करणे. या अटीवर त्याचा जामीन मंजूर केला आहे. न्यायालय़ाने राज कुंद्रा आणि रायन थोरपे यांना जामीन मंजूर करताना आपल्या आदेशात म्हटले आहे की, पॉर्न फिल्म प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत सर्व साक्षीदारांचे जबाब घेत रेकॉर्ड केले आहे. याशिवाय विहान इंडस्ट्रीचे सर्व मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहेत. त्यामुळे पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

या व्यतिरिक्त न्यायालयाने आपल्या आदेशात असेही म्हटले आहे की, या प्रकरणाशी संबंधित इतर आरोपींना जामीन मिळाला आहे. मात्र पुढील तपास सुरू राहणार आहे. मात्र त्यामुळे निकाल लागेपर्यंत आरोपींना तुरुंगात ठेवता येत नाही. या आधारावर, मुंबईच्या सत्र न्यायालयाने राज कुंद्रा आणि त्यांचे सहकारी रायन थोरपे यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे राज कुंद्रा आणि रायन थोरपे याची मंगळवारी तुरुंगातून सुटका केली.

या दोघांनाही पॉर्न चित्रपट बनवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. त्याच्यावर पॉर्न व्हिडिओ तयार करण्याचा आणि ते विविध अॅप्सद्वारे प्रदर्शित केल्याचे आरोप आहे. राज कुंद्रासह त्याचा सहकारी रायन थोरपे यालाही अटक करण्यात आली होती. यात रायनलाही जामीन मिळाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यात ४३ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या साक्षीदारांमध्ये राज कुंद्राची पत्नी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांचा समावेश आहे.

अटकेनंतर राज आणि रयान यांना २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती मात्र या कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतरही राज आणि रायन यांना मुंबई न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवाना केले. यावेळी मुंबई न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारल्यानंतर राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले, मात्र सुनावणीनंतर हा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

उद्योगपती राज कुंद्राला जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली. कुंद्राला मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले. जवळजवळ 2 महिन्यांनंतर म्हणजे २१ सप्टेंबरला त्याची सुटका झाली. सोमवारी मुंबईच्या न्यायालयाने राज कुंद्राला ५०,००० रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.


 

First Published on: September 23, 2021 1:48 PM
Exit mobile version