अनुष्काचे फोटोशूट पाहून विराट झाला ‘क्लीन बोल्ड’

अनुष्काचे फोटोशूट पाहून विराट झाला ‘क्लीन बोल्ड’

अनुष्काचे फोटोशूट पाहून विराट झाला 'क्लीन बोल्ड'

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी फक्त भारतात नाही तर जगातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. विराट आणि अनुष्काची उत्तम बॉन्डिंग आहे. सोशल मीडियावर या दोघांचा हा खास बॉन्ड अनेक वेळा पाहायला मिळतो. अलीकडेच विराटने पुन्हा एकदा अनुष्काच्या फोटोवर कमेंट केली आहे. नुकतेच अनुष्काने व्होग मॅगझिनसाठी एक फोटोशूट केले आहे. अनुष्काच्या या ग्लॅमरस लूकमधील फोटो पाहून चाहत्यांच्या लाईक्सचा आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. विराटाला देखील अनुष्काचा हा फोटो पाहून राहवलं नाही. त्याने देखील तिच्या फोटोवर कमेंट केली. विराटाने कमेंटमध्ये फायर इमोजी आणि हार्ट इमोजी पाठवून न बोलता सर्व काही सांगितले आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि मोनी रॉयला देखील अनुष्का हा अंदाज आवडला आहे.

या फोटोमध्ये अनुष्का निळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. सध्या अनुष्काचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अनुष्काने निर्माती म्हणून वेबसीरिजच्या क्षेत्रात पदार्पण केले. तिची अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरील ‘पाताल लोक’ ही वेबसीरिज फारच चर्चेत आली. त्यानंतर तिचा ‘बुलबुल’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

२०१८मध्ये अनुष्काने ‘जीरो’ या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. ‘जीरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती उतरला नसला तरी अनुष्काचा अभिनय प्रेक्षकांचा आवडला होता.


हेही वाचा – Video: सुशांतच्या ‘दिल बेचारा’ या शेवटच्या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज


 

First Published on: July 10, 2020 8:34 PM
Exit mobile version