सलमानने शेअर केले सईसोबतचे ‘दबंग -३’ च्या सेटवरील फोटो

सलमानने शेअर केले सईसोबतचे ‘दबंग -३’ च्या सेटवरील फोटो

बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान आपल्या चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटांविषयी विविध चटपटीत बातम्या देऊन त्याच्या चित्रपटांनी चर्चेत ठेवतो. नुकताच सलमान खानने त्याच्या आगामी दबंग-३ या चित्रपटाच्या सेट वरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो सई मांजरेकरसह नदी किनारी उभा आहे.

मराठी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांची कन्या सई मांजरेकर दबंग-३ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या पहिल्या भागात महेश मांजरेकर यांनी चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाने पार पाडलेल्या रज्जोच्या वडीलांची भूमिका केली होती. दबंग-३ मध्ये सई मांजरेकर तरुण चुलबूल पांडेच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सई मांजरेकर, सलमान खान सोबत अरबाज खानसुद्धा दिसणार आहेत.

First Published on: September 22, 2019 3:54 PM
Exit mobile version