‘दिलबर’ गाण्यावर सनाया आणि फातिमाची ‘दंगल’

‘दिलबर’ गाण्यावर सनाया आणि फातिमाची ‘दंगल’

फातिमा सना शेख आणि सनाया मल्होत्रा

सध्या बॉलीवूडची काही गाणी सोशल मीडियावर इतकी ट्रेंड होत आहेत की, सेलिब्रिटीदेखील या गाण्यांवर डान्स करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. नुकतंच ‘सत्यमेव जयते’मधील ‘दिलबर’ या गाण्यावर नोरा फतेहीनं ठुमके लावले आहेत. हे गाणं खूपच प्रसिद्ध झालं आहे. याच गाण्यावर ‘दंगल गर्ल्स’ फातिमा सना शेख आणि सनाया मल्होत्रानं डान्स केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर सनाया आणि फातिमानं आपल्या डान्सचे व्हिडिओ शेअर केले आहेत. या दोन्ही अभिनेत्री ‘दिलबर’ गाण्यावर सिझलिंग परफॉर्मन्स देत आहेत. नृत्यदिग्दर्शक शाजेब शेखबरोबर दोघींनीही आपल्या अदा दाखवल्या आहेत. दोघींच्याही व्हिडिओला आतापर्यंत लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

फातिमा आणि सनायाचा जलवा

फातिमा आणि सनाया या दोघींनीही ‘दंगल’ चित्रपटात काम केल्यानंतर दोघींनाही चांगलंच फेम मिळालं. त्यानंतर नेहमीच दोघीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसल्या आहेत. या व्हिडिओमध्येदेखील दोघींनीही आपल्या डान्सचा जलवा दाखवला आहे. या दोन्ही दंगल गर्ल्स सध्या बॉलीवूडच्या नव्या चित्रपटांच्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. फातिमा सना खानचा लवकरच आमिर खानबरोबर ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ येणार असून सनाया मल्होत्रा आयुषमान खुरानाबरोबर ‘बधाई हो’ चित्रपटात प्रेक्षकांना दिसेल. तर विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘पटाखा’ या चित्रपटातदेखील महत्त्वाच्या भूमिकेत सनाया मल्होत्रा दिसणार आहे. २८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘दिलबर’ गाणं असलेल्या ‘सत्यमेव जयते’ हा जॉन अब्राहमचा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या दोघींच्या व्हिडिओवर नोरा फतेही मात्र आता या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया देणार याकडे नक्कीच तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहील.

First Published on: July 31, 2018 4:43 PM
Exit mobile version