‘तारक मेहता का उलटा चष्मा’: दया बेनच्या परत येण्यावर नवऱ्याचा आक्षेप?

‘तारक मेहता का उलटा चष्मा’: दया बेनच्या परत येण्यावर नवऱ्याचा आक्षेप?

दयाबेन आणि जेठालाल

तारक मेहता का उलटा चष्मा म्हंटलं तर ‘हे मॉं माताजी!’ म्हणाऱ्या दया बेनचा चेहरा सगळ्यात आधी समोर येतो. ही मालिका २०१० मध्ये सुरु झाल्यापासून दया बेनचं नाव या मालिकेशी जोडलं गेलं आहे. मध्यंतरी २०१७ मध्ये प्रसूती रजा घेतलेल्या दया बेननं अजून तरी मालिकेत पुन्हा प्रवेश केलेला नाही. सध्याच तिच्या परत येण्याबाबत एक हिंट देण्यात आली आहे. दया बेनच्या एन्ट्रीचा एक टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण तिच्या या परत येण्याबाबत दिशाच्या नवऱ्याच्या काही समस्या आहेत. दिशाच्या व तिच्या बाळाचा विचार करत वेगळ्या सुविधा देण्यास देखील मालिकेचे निर्माते तयार आहेत पण तरीही दिशाच्या नवऱ्याला ते मंजूर नाही.

नेमकी अडचण काय?

दिशाला तारक मेहतावर परत आणण्यासाठी मालिकेचे निर्माते खूप प्रयत्न करत आहेत. तिच्या वेळेप्रमाणे काम करायला देखील ते तयार आहेत. पण दिशाच्या नवऱ्याला पटलेला दिसत नाही. इतर मागण्यांव्यतिरिक्त मालिकेचे निर्माते दिशाला फक्त ३ तास काम करण्यास देखील मंजूरी दिली आहे व तिच्या मुलासाठी वेगळी नर्सरी देण्याचे वचन देखील दिले आहे.  परंतु तरीही दिशाचा नवरा नाहीच म्हणत असल्याचं कळतं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मालिकेच्या निर्मात्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. दिशाला पुन्हा मालिकेत बघायला तीचे फॅन्स उत्सुक आहेत.

जवळजवळ २ वर्षांपासून दिशा वकानी मालिकेतून गायब आहे. दिशाची दया म्हणून लोकप्रियता प्रचंड आहे. मालिकेची टीएआरपीही दयाच्या येण्यामुळे वाढणार आहे.

First Published on: October 22, 2019 6:23 PM
Exit mobile version