वयाच्या 18 व्या वर्षात दीपिका पादुकोणला मिळाला होता सगळ्यात वाईट सल्ला

वयाच्या 18 व्या वर्षात दीपिका पादुकोणला मिळाला होता सगळ्यात वाईट सल्ला

वयाच्या 18 व्या वर्षात दीपिका पादुकोणला मिळाला होता सगळ्यात वाईट सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण नेहमीचं तिच्या सुंदर अभिनयाने चाहत्यांना आकर्षित करत असते. सोशल मीडियावरही करोडो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांत दीपिकाचा ‘गहराइयाँ” हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटामध्ये तिने ‘शकुन बत्रा’ या नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या या व्यक्तीरेखेचं चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील सर्व कलाकारांनी सक्सेस पार्टी सेलिब्रेट केली. या चित्रपटात दीपिका जी भूमिका साकारतेय त्यात एका निर्णयामुळे तिची लाईफ कसे उद्धवस्त होते आणि त्यातून ती कशी सावरते हे दाखवण्यात आले आहे.

दरम्यान यापूर्वी झालेल्या फिल्मफेयर अवॉर्डदरम्यानही दीपिकाला तिच्या आयुष्यातील सगळ्यात चांगल्या आणि वाईट सल्लाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा ती म्हणाली की, मला माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला सल्ला शाहरूख खानकडून मिळाला होता आणि त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला पण मिळालं होतं. शाहरूख खानाने मला सल्ला दिला की, तुला ज्याच्यासोबत काम करायला आवडेल त्यासोबतचं काम कर, कारण जेव्हा तुम्ही एक चित्रपट बनवत असता, तेव्हा तुम्ही एक आयुष्य सुद्धा जगत असता. त्या दरम्यान तुम्ही काही आठवणीही साठवून ठेवता आणि काही अनुभव सुद्धा घेत असता.’

त्याबरोबरंच आयुष्यातल्या सगळ्यात वाईट सल्ल्याबाबत खुलासा करताना दीपिका म्हणाली की, मला सगळ्यात वाईट सल्ला ब्रेस्ट इम्प्लांटचा मिळाला होता. तेव्हा मी १८ वर्षांची होते. मी आश्चर्य वाटतेय की, मी ती गोष्ट कधी गांभीर्याने का  घेतली नाही?

दीपिकाने २००७ मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘ओम शांती ओम’ हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात तिने  शाहरुख खान आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबत काम केले होते. याचे दिग्दर्शन फरहा खानने केले होते. तेव्हा दीपिका २१ वर्षांची होती. या नंतर तिने ‘ये जवानी है दीवानी’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅप्पी न्यू ईयर’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.


हेही वाचा : ‘हे’ असणार प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या बाळाचं नाव; मधू चोप्रांचा खुलासा

First Published on: February 28, 2022 3:43 PM
Exit mobile version