छपाकची संकटं संपता संपेनात; एक संपलं, दुसरं सुरू झालं!

छपाकची संकटं संपता संपेनात; एक संपलं, दुसरं सुरू झालं!

दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी एकाने छपाकची स्टोरी आपली असल्याचा दावा केला होता. जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळं चर्चेत आलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा ‘छपाक’ चित्रपट बुधवारी एका वेगळ्याच कारणामुळं पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटातील खलनायकाच्या नावावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर ट्विटरवर #BoycottChhpaak आणि #ISupportDeepika हे दोन ट्रेंड सुरू झाले होते. दीपिका चर्चेच्या केंद्रस्थानी होती. आता दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला. दीपिकाचा हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील पीडित लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित आहे. एका मासिकाच्या लेखात लक्ष्मीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव बदलण्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर ‘नदीम खान’ आणि ‘राजेश’ ही दोन नावं ट्रेंड होऊ लागली.

तो दावा चुकीचा

‘छपाक’ या चित्रपटात नदीम खान अशा कोणत्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. चित्रपटात मालतीच्या बॉयफ्रेंडचे नाव राजेश आहे. तसेच मालतीवर अॅसिड हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव बशीर खान उर्फ बाबू असल्याचे दाखवण्यात आलं आहे. म्हणजेच ज्या पद्धतीने सोशल नेटवर्किंगवर हल्लेखोराचे नाव बदल्याचा दावा केला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे दिवसेंदिवस छपाकवर होत असणारे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

वकिलाची कोर्टात धाव

अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाने सिनेमात क्रेडिट न दिल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची न्यायालयात मागणी केली आहे. वकील अपर्णा भट्ट यांच्या मते, अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील आहे. असं असतानाही सिनेमात तिला क्रेडिट देण्यात आलं नाही. याचविरुद्ध  दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली आहे.

First Published on: January 9, 2020 2:18 PM
Exit mobile version