अतरंगी फॅशन करणाऱ्या रणवीरला सासरी घालावा लागतो ड्रेसकोड!

अतरंगी फॅशन करणाऱ्या रणवीरला सासरी घालावा लागतो ड्रेसकोड!

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगची फॅशन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. रणवीरची अतरंगी फॅशन ही जगजाहीर आहे. कोणताही कार्यक्रम असो चर्चा तर रणवीरच्या ड्रेसींगचीच जास्त होते. मात्र फॅशनसाठी मॅड असणाऱ्या रणवीरला सासरी जाताना मात्र हमखास ड्रेसकोड पाळावा लागतो. परंतु, असं एक ठिकाण आहे जिथे रणवीरच्या अशा विचित्र कपड्यांवर बंदी आहे आणि ते ठिकाण म्हणजे रणवीरचं सासर. ही गोष्टीचा खुद्द दीपिकानेच खुलासा केला आहे.

रणवीरला दीपिकाच्या घरी सहज भेट देताना किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाताना एक खास ड्रेसकोड ठरवून दिलेला आहे. रणवीरला त्यावेळी हेच कपडे परिधान करावे लागतात. ज्यावेळी रणवीर माझ्या आई-वडिलांसोबत असतो त्यावेळी त्याला पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पँट असा ड्रेसकोड ठरवून दिलेला आहे. जर एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमाला त्याला जायचं असल्यास काळ्या किंवा निळ्या रंगाची पँट, पांढऱ्या रंगाचे शर्ट किंवा कोणत्याही रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट घालून तो येऊ शकतो” असे दीपिका यावेळी म्हणाली. मात्र दीपिकावर जिवापाड प्रेम करणारा रणवीरही तिच्या आज्ञेचं पालन करतो.

दरम्यान, दीपिका आणि रणबीर नुकतेच त्यांच्या ’83’ चित्रपटाच्या चित्रीकरणातून मोकळे झाले आहेत. कपिल देव आणि १९८३च्या विश्वचषक विजयावर आधारित ’83’ हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा ‘गली बॉय’ रणवीर सिंग भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं १९८३ मध्ये विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक विजयाचा तो थरार ’83’ या सिनेमात अनुभवता येणार आहे.

First Published on: October 12, 2019 3:16 PM
Exit mobile version