धनुषची कार्बन कॉपी ! घटस्फोटानंतर अभिनेता मुलासोबत घालवतोय क्वॉलिटी टाइम

धनुषची कार्बन कॉपी !  घटस्फोटानंतर अभिनेता मुलासोबत घालवतोय क्वॉलिटी टाइम

धनुषची कार्बन कॉपी ! घटस्फोटानंतर अभिनेता मुलासोबत घालवतोय क्वॉलिटी टाइम

साऊथ स्टार धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांनी मागील महिन्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या १८ वर्षांनंतर वेगळं होण्याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. २००४मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. दोघांना आता यत्र आणि लिंगा अशी दोन मुले देखील आहेत. विभक्त झाल्यानंतर दोघेही आप आपल्या कामाला लागले आहेत. धनुष सध्या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र बिझी शेड्युलमधून वेळ काढून धनुष त्याचा मोठा मुलगा यत्रा सोबत क्वालिटी टाईन घालवतो आहे. ऐश्वर्या रजनीकांतसोबत घटस्फोटो झाल्यानंतर धनुषने पहिल्यांदाच मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे.

धनुषने मुलगा यत्रा सोबचा फोटो शेअर केला आहे. मुलाला पाहून सर्वांनी ‘अरे हा तर ज्युनिअर धनुष’ असे म्हटले. कारण या आधी धनुषचा मुलगा कधीच लाइम लाइटमध्ये आला नव्हता. धनुषने यत्रा सोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघेही फार खुश दिसत आहेत. बँकग्राऊंडला एकe डोंगरात होणारा सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळत आहे आणि बाप लेकामध्ये प्रेमाचा संवाद सुरू आहे. ‘या आधी मी याला कुठे तरी पाहिले आहे ? #yathradhanush… #naanevaruven’ असे मजेशीर कॅप्शन देत धनुषने फोटो शेअर केला केला आहे.

धनुष सध्या ‘नान वरुवेन’ (naanevaruven) या सिनेमाचे शुटींग करत आहे. शुटींग सध्या उटी येथे सुरू आहे. धनुषच्या अपकमिंग वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर नान वरुवेन सह ‘सर’ या तमिळ तेलुगू सिनेमातही दिसणार आहे. त्याचप्रमाणे डिज्नी हॉटस्टारवर ‘मारन’ हा अँक्शन थ्रिलर सिनेमा देखील पाहता येणार आहे.


हेही वाचा – अमृता फडणवीस यांची किचेन कलाकार मध्ये हजेरी

First Published on: February 17, 2022 10:13 AM
Exit mobile version