‘बुगी वुगी’ शोमधून ५ लाख जिंकून फेडले कर्ज,’ स्ट्रगलचे दिवस आठवून धर्मेश झाला भावूक

‘बुगी वुगी’ शोमधून ५ लाख जिंकून फेडले कर्ज,’ स्ट्रगलचे दिवस आठवून धर्मेश झाला भावूक

'बुगी वुगी' शोमधून ५ लाख जिंकून फेडले कर्ज,' स्ट्रगलचे दिवस आठवून धर्मेश झाला भावूक

डान्स विश्वातील धर्मेश येलांडे हे नाव आज संपूर्ण देशात परिचीत झाले आहे. धर्मेश येलांडेपेक्षाही त्याला धर्मेश सर या नावाने अधिक ओळखले जाऊ लागले. ‘डान्स इंडिया डान्स’ शोमधून धर्मेशला धर्मेश सर हे नाव मिळाले. धर्मेश आज एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर असला तरी त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. एक स्पर्धेक म्हणून आलेला धर्मेश आता डान्स प्लस शोमध्ये जज म्हणून काम करतोय. परंतु तुम्हाला माहितीयं ९० दशकातील सर्वाधिक लोकप्रिय डान्स रियॅलिटी शो ‘बुगी वुगी’ शोमध्ये पहिल्यांदाच जज पाहायला मिळाले. जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे ‘बुगी वुगी’चे पहिले जज होते. हेच जज आज धर्मेश, माधुरी जज करत असलेल्या ‘डान्स दिवाने ३’ या शोमध्ये स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहेत.

नुकताच ‘डान्स दिवाने ३’ च्या स्पेशल गेस्ट शोचा प्रोमो आउट झाला. या प्रोमोमध्ये धर्मेश आपल्या स्ट्रगलिंग दिवसांच्या आठवणींना उजाळा देत भावूक झालेला दिसतो. यावर बोलताना धर्मेश सांगतोय की, ‘बुगी वुगी’ हा डान्स रिअँलिटी शो जिंकल्याने त्यातून मिळालेल्या पैशांतून मला कर्ज फेटता आले. धर्मेशचे हे बोलणे गेस्ट जावेद जाफरी आणि नावेद जाफरीही मनापासून ऐकत आहेत. यावर धर्मेश पुढे सांगतो, ‘तुमच्या शोमधून मी डान्स इंडस्ट्रीत पहिले पाऊल ठेवले. आणि त्यानंतर माझ्या यशस्वी करियरचा पहिला मार्ग सुरु झाला. वडील चहाचे दुकान चालवायचे… पण त्या पैशातून कुटुंबाचे भागायचे नाही… आमच्यावर खूप कर्ज झाले.. मी त्यावेळी डान्सशिवाय काहीच करू शकत नव्हतो… त्याचदरम्यान मी बुगी वुगी शो जिंकून ५ लाख रुपये मिळवे.’ यावेळी अनेक जुन्या आठवणी आठवून धर्मेश भावूक झाला होता.

यावेळी जावेद यांनी धर्मेशची प्रशांस करत सांगितले की, ‘त्यावेळच्या जबाबदारीच्या भावनेमुळे तु आज इथपर्यंत पोहचलास… आणि यामागे तुझ्या वडीलांचे आशिर्वादही आहेत.’ धर्मेशने एक दोन नाही तर तब्बल १८ वर्ष डान्सर म्हणून काम केलं. गुजरातमधील एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या धर्मेशने डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. रेमोला डिसोजाल आदर्श मानून मुंबईत आलेला धर्मेश आज त्याच्यात शोमध्ये जज म्हणून बसला असून संघर्ष आणि यशाचं उदाहरण देत आहे.


 

First Published on: June 20, 2021 4:02 PM
Exit mobile version