Video: ढिंच्याक पूजा म्हणते, ‘होगा ना करोना’

Video: ढिंच्याक पूजा म्हणते, ‘होगा ना करोना’

Video: ढिंच्याक पूजा म्हणते, 'होगा ना करोना'

‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यामुळे रात्रोरात्र ढिंच्याक पूजा स्टार झाली. आता पुन्हा एकदा ती नवं गाणं घेऊन आली आहे. तिने हे नवं गाणं करोना व्हायरसवर तयार केलं आहे. ढिंच्याक पूजाच्या या गाण्याचं नाव ‘होगा ना करोना’ असं आहे. सोशल मीडियावर ढिंच्याक पूजाचं गाणं तुफान चर्चेत आलं आहे. ढिंच्याक पूजाच्या या गाण्याला ४ लाखाहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. तिचे चाहते तिच्या नव्या गाण्यावर भरभरून प्रतिसाद देत आहेत. ढिंच्याक पूजाचा अनोखा अंदाज हा लोकांना फारच आवडलेला दिसत आहे.

पूजाचं पहिलं गाणं ‘सेल्फी मैंने ले ली आज’ सोशल मीडियावर फारच व्हायरल झालं होत. त्यानंतर पूजा आपल्याला लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मध्ये दिसली होती. बिग बॉसच्या घरात देखील तिने अनेक गाणी बनवली होती. या गाण्यांना ट्विटवर खूपच शेअर केलं होत. २०१७ मध्ये बिग बॉस सीझन ११ मध्ये पूजा होती. यानंतर ती कलर्सवरच्या एंटरटेनमेंट की रात या शोमध्ये दिसली होती.

बघायला गेलं तर सध्या जगात करोना व्हायरस थैमान घालत आहे. अनेक लोकांना करोनामुळे स्वतःला घरात बंद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक बॉलिवूड कलाकार वेगवेगळ्या माध्यमातून जगजागृती करत आहेत. आतापर्यंत जगभरात करोना व्हायरसचे २ लाख २९ हजार ४६९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यापैकी ९ हजार २९२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – Video: Coronavirus करोनामुळे सोनमने सासूशी साधला खिडकीतून संवाद!


 

First Published on: March 19, 2020 9:13 PM
Exit mobile version