महेश मांजरेकरांची लाडकी लेक करतेय तेलुगू चित्रपटात डेब्यू!

महेश मांजरेकरांची लाडकी लेक करतेय तेलुगू चित्रपटात डेब्यू!

सई मांजरेकर

अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दबंग ३ जरी फारसा गाजला नसला तरी या चित्रपटामुळे सई मात्र चांगलीच लोकप्रिय झाली. सईचं स्वत:च फॅन तयार झाले. सईच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. लवकरच सई एका तेलुगू चित्रपटात झळकणार आहे.

मेजर असं या तेलुगू चित्रपटाच नाव आहे. सई या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत आहे. या हल्ल्यात शहिद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

माझ्यासाठी नेहमीच चित्रपटाची कथा काय आहे हे महत्त्वाच असणार आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातील पात्र मला आवडले. चित्रपटाची ऑफर येताच मी लगेचच चित्रपटाला होकार कळवला. मी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासाठी तयार आहे आणि हा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. आता मी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्याची वाट पाहत आहे.’

सध्या चित्रपटाचे अर्धे शुटींग पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी सई हैद्राबादला जाणार आहे.

First Published on: September 24, 2020 7:01 PM
Exit mobile version