दिशा पटानी होणार ह्रतिक रोशनची नवी हिरॉईन

दिशा पटानी होणार ह्रतिक रोशनची नवी हिरॉईन

दिशा पटानी आणि ऋतिक रोशन

सलमान खानच्या भारत चित्रपटानंतर अभिनेत्री दिशाच्या हाती आणखी एक बिग बजेट चित्रपट लागला आहे. दिशा पटानी आता हँडसम हंक ह्रतिक रोशन सोबत रोमान्स करताना दिसेल. माध्यमांच्या वृत्तानुसार, डेव्हिड धवन निर्मित आणि रोहित धवन दिगदर्शित चित्रपटात दिशा आणि ह्रतिक ही जोडी एकत्र दिसणार आहे. बागी हिट झाला आणि दिशाच्या करियरने चांगला वेग पकडला आहे.
चित्रपट निर्माते डेव्हीड धवन यांचा मोठा मुलगा रोहीत धवन चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कार्यारत आहे. रोहीतने आता पर्यत ‘देसी बॉईज आणि ‘ढिशूम’ असे दोन चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. आता रोहीत त्याच्या येणाऱ्या तिसऱ्या चित्रपटाच्या कथानकावर काम करत आहे.

ह्रतिक रोशनचे सध्या लागोपाठ चार चित्रपट येणार आहेत. ‘सुपर ३०’ च्या शूटिंगमध्ये सध्या तो व्यस्त आहे. अभिनेता टायगर श्रॉफसह तो पुढील चित्रपटात ‘यशराज फिल्म्स’ मध्ये दिसणार आहे, त्याचं तो काम, सध्या करत आहे. एवढेच नव्हे तर, राजकुमार गुप्ताच्या पुढच्या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत तो दिसणार आहे. अर्जुनने आधीपासूनच आपल्या पुढील प्रोजेक्ट बद्दल सांगितले असले, तरी अजून या प्रोजेक्ट बाबत ह्रतिक रोशन कडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सूत्रांनी सांगितले की, रोहित धवनच्या या प्रोजेक्ट बद्दल अधिकृत घोषणा कदाचित या वर्षी जून किंवा जुलैच्या अखेरीस होईल. हा चित्रपट साजिद नाडियादवाला निर्मित करत आहेत, डिसेंबर २०१८ किंवा जानेवारी २०१९ पर्यंत ह्या चित्रपटाचे काम पूर्ण होईल.
दिशा पटानीच्या बागी २ या चित्रपटाला बॉक्‍सऑफ‍िसवर प्रेक्षकांचा चांगला र‍िस्‍पॉन्‍स मिळाला होता. तर आता दिशा आणि ह्रतिक रोशनला बिगस्क्रीन वर एकत्र त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

First Published on: May 22, 2018 7:13 AM
Exit mobile version