दिशा पटनी दिसणार सलमानच्या ‘भारत’मध्ये

दिशा पटनी दिसणार सलमानच्या ‘भारत’मध्ये

दिशा पटनी

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरु झाले आहे. १० वर्षांनी जगत् सुंदरी प्रियांका चोप्रा आणि सलमान खान एकत्र काम करणार असल्यामुळे सध्या या चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण झाली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी दिशा पटनीचीदेखील भारत’ चित्रपटात वर्णी लागल्याची बातमी आहे.

आपल्या ‘धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘बागी – २’ मध्ये दिशाने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन केले. केवळ दोन चित्रपटानंतर सलमान खानबरोबर काम करण्याची संधी मिळणे हा दिशासाठी जॅकपॉटच म्हणावा लागेल. या चित्रपटात दिशा कोणती भूमिका साकारणार आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झाले नसून गुलदस्त्याच आहे.

दिशाने आतापर्यंत एक आंतरराष्ट्रीय आणि दोन बॉलीवूड चित्रपटात काम केले असून तिचे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांना आवडले आहेत. आता ‘भारत’मध्ये दिशा आपल्या अभिनयाने आणि दिसण्याने प्रेक्षकांना भुरळ घालू शकते का? आणि सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसमोर आपले असे वेगळे व्यक्तीमत्त्व सिद्ध करू शकणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटातही झळकण्याची संधी मिळाल्याने येत्या काळात चित्रपटांमध्ये दिशाच्या अभिनयाचे नवे पैलू त्याच्या चाहत्यांना पाहायला मिळणार हे नक्की.

दरम्यान, सलमान खान सध्या रमजान ईदला प्रदर्शित होणाऱ्या रेस 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून प्रियांका चोप्रा आपल्या क्वांटिको सीझन ३ च्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. प्रियांका भारतच्या चित्रिकरणासाठी लवकरच भारतात येईल. तर दिशा सध्या बागी २ च्या यशाची चव चाखत आहे.

First Published on: May 17, 2018 11:48 AM
Exit mobile version