नव्या ‘दयाबेन’ चा शोध सुरू; दिशाची अजून वाट बघणार नाही

नव्या ‘दयाबेन’ चा शोध सुरू; दिशाची अजून वाट बघणार नाही

नव्या 'दयाबेन' चा शोध सुरू;

विनोदी मालिकेच्या यादीत हमखास घेतले जाणारे नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या ११ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील विशेष प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले पात्र म्हणजे सर्वांची लाडकी दयाबेन. सप्टेंबर २०१७ पासून या मालिकेत महत्वाचे पात्र असलेली दया बेन म्हणजेच दिशा वकानी मालिकेपासून दूर गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून तीचे चाहत्यांसोबत सहकलाकार तिच्या परतण्याची वाट बघत होते. गेल्या काही दिवसांपासून शोच्या निर्मात्यांनी तिला मालिकेत परतण्यासाठीचा निर्णय घेण्याकरिता एक महिन्याचा अवधी दिला होता.

दयाबेनच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

दिशा वाकानी गेल्या अनेक महिन्यांपासून मालिकेतून गायब आहे. दिशाने गेल्या वर्षी एका गोंडस मुलीला जन्म दिला. दिशा गरोदर असताना देखील मालिकेचे शुटिंग करत होती. पण आता तिची मुलगी लहान असल्याने ती मालिकेपासून गेल्या कित्येक महिन्यांपासून दूर असल्याचे समजते. आता प्रेक्षकांची लाडकी दयाबेन मालिकेत पुन्हा केव्हा बघायला मिळणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. मात्र दिशाच्या चाहत्यांसाठी एक अतिशय वाईट बातमी आहे.

शोध नव्या दयाबेनचा..

बॉम्बे टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेत दिशा आता परतणार नाही. प्रोड्युसर असित मोदी यांनी बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले की, ‘आता नवीन दयाबेनचा शोध घ्यावा लागणार आहे. कारण कोणताही कलाकार मालिकेपेक्षा मोठा असू शकत नाही. दयाबेन शिवाय तिचे मालिकेतील कुटुंब हे पुर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आता एका नव्या चेहऱ्यासोबत या मालिकेची कथा पुढे जाणार आहे.’

दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू

या सोबतच, त्यांनी असे ही सांगितले की, ‘या देशात कामावर जाणाऱ्या अनेक महिला गरोदरपणात मॅटर्निटी ब्रेक घेतात आणि पुन्हा कामावर परततात. आम्ही देखील दिशाला काही महिन्यांचा ब्रेक दिला. पण आता आम्ही तिची अधिक वाट पाहू शकत नाही. कोणत्याही कलाकाराला बदलणं हा निर्णय एका दिवसात घेतला जात नाही. त्यासाठी एक महिना आधी पासूनच कथेवर काम करावे लागते. आम्ही दयाच्या भूमिकेसाठी ऑडिशनला सुरुवात देखील केली आहे.’

गेल्या काही दिवसात मालिकेची कथालेखक शैलेश लोढा यांनी सांगितल्यानुसार दयाबेन म्हणजेच दिशा मालिकेत परतेल असे कंन्फर्म झाले होते. दिशा वकानीच्या परतण्यावर शैलेश लोढ़ाने सांगितले होते की, ”धैर्य का फल दया होता है.” परंतु आता असित मोदीने दिशा पुन्हा मालिकेत परतणार नाही, हे स्पष्टपणे सांगितले. ही बातमी ऐकताच दयाबेनच्या चाहत्यांमध्ये नाराजी दिसत आहे.

First Published on: April 3, 2019 2:49 PM
Exit mobile version