जातीबाहेरील लग्नाला पालकांचा विरोध; अभिनेत्रीने बांधली गुपचूप लग्नगाठ!

जातीबाहेरील लग्नाला पालकांचा विरोध; अभिनेत्रीने बांधली गुपचूप लग्नगाठ!

जातीबाहेरील लग्नाला पालकांचा विरोध; अभिनेत्रीने बांधली गुपचूप लग्नगाठ!

नवीन वर्ष सुरु होण्यास काहीच दिवस बाकी आहेत. सरत्या वर्षात अनेक सिने-टीव्ही कलाकारांनी लग्नगाठ बांधली. आता आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. तिचे नाव आहे दिव्या भटनागर. ये रिश्ता क्या कहलाता है या हिंदी टीव्ही मालिकेत दिव्या काम करते. सिने-मालिका इंडस्ट्रित काम करणाऱ्या गगनसोबत दिव्याने लग्नगाठ बांधली आहे. महत्त्वाचे म्हणजे गगन आणि दिव्याने पालकांच्या विरोधात जात हा निर्णय घेतल्याचे खुद्द दिव्याने सांगितले आहे.

पालकांचा विरोध का?

गगनसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर दिव्याने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये तिने गुपचूप लग्न करण्याबाबतचा खुलासा केला. ती म्हणाली की, दोघांच्याही कुटुंबियांचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे. त्यामुळे आम्ही मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईत लग्न करण्याचा निर्णय घेतला.”

२०१५ मध्ये साखरपुडा

दरम्यान २०१९च्या शेवटच्या महिन्यात विवाहबंधनात अडकलेल्या दिव्या-गगन या जोडीचा साखरपुडा मात्र २०१५ मध्येच पार पडला होता, अशी माहितीसुद्धा खुद्द दिव्यानेच दिली. दरम्यान दिव्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यामध्ये उडान, जित गई तो पिया मोरे, गुलाबो या मालिकांचा समावेश आहे. तर गगन हा सुद्धा सिने-टव्ही इंडस्ट्रीमध्येच करिअर करत आहे. मागील ५ वर्षांपासून दोघे एकमेकांना ओळखतात.

First Published on: December 23, 2019 6:00 PM
Exit mobile version