‘वेडिंग चा शिनेमा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘वेडिंग चा शिनेमा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

‘वेडिंग चा शिनेमा’ प्रेक्षकांच्या भेटीस

गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक आणि मधली सुट्टी अशा कार्यक्रमातून विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या टीजरमध्ये ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं ह, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं ह’ हे बोल असलेलं हे एक गाणं ऐकायला मिळत आहे.

या कलाकारांनी साकारल्या भूमिका

या चित्रपटात प्रमुख भूमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांनी केलं आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

असा आहे हा सिनेमा

लग्नपध्दती, लग्नात घडणाऱ्या गमतीजमतीवर हा सिनेमा आधारीत आहे. संपूर्ण कुटूंब एकत्र बसून हा सिनेमा बघू शकता. तसेच आजपर्यंत प्रेक्षकांनी सलील कुलकर्णी यांना ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’, सारेगमपच्या पर्वाचे परिक्षण करताना अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून बघितलं होतं. मात्र आता सलील कुलकर्णी पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक म्हणून प्रेक्षकांमसमोर येणार आहेत. सलील कुकर्णी यांनी आपल्या गाण्यांमधून कधी प्रेक्षकांना हसवलं तरी कधी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ असेल किंवा ‘डीबाडी डीपांग‌’ सारखं धम्माल गाणं असेल त्यांच्या प्रत्येक गाण्यांनी आजपर्यंत प्रेक्षकांना आनंदच दिला आहे. त्यामुळे सलील घेऊन येत असलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपटही प्रेक्षकांना आनंद देऊन जाईल यात शंकाच नाही.


वाचा – फेक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलकरता ‘वीरांगणा’चे सिलेक्शन


 

First Published on: January 29, 2019 4:12 PM
Exit mobile version